Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किम तुम्हाला करतील मालामाल? जाणून घ्या

Post Office Saving Schemes: पैशांचा होईल वर्षाव! पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किम तुम्हाला माहितीयत का? 

Nov 14, 2022, 18:55 PM IST

Post Office Saving Schemes: आजकाल कमाईसह गुंतवणूकीकडे (Investment) नागरीकांचा जास्त कल असतो. त्यामुळे नेमकी कुठे गुंतवणूक करावी,असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. काही लोक गुंतवणूकीसाठी अनेक पर्यायांचा वापर करतात, तर काही लोक अजूनही गुंतवणूकीस घाबरतात. त्यामुळे अशा नागरीकांना सुरक्षित गुंतवणूक करता यावी यासाठी आम्ही काही पोस्ट ऑफिसच्या स्किमची (Post Office Saving Schemes) माहिती देणार आहोत.ज्यामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर लवकरच तुमचे पैसे दुप्पट होतील. त्यामुळे या स्किम कोणत्या असणार आहेत. त्या जाणून घेऊयात. 

1/5

Post Office, Post Office Scheme, Post Office Saving Schemes,  post office small saving, small saving, marathi news, news in marathi

पोस्ट ऑफिसची (Post Office) ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना देखील आहे. या बचत योजनेवर सध्या 7.4 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत तुमचे पैसे सुमारे 9.73 वर्षांत दुप्पट होतील.

2/5

Post Office, Post Office Scheme, Post Office Saving Schemes,  post office small saving, small saving, marathi news, news in marathi

तुम्हाला पोस्ट ऑफिस (Post Office) रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) वर सध्या 5.8 टक्के व्याज दिले जात आहे, त्यामुळे जर या व्याजदराने पैसे गुंतवले गेले तर ते सुमारे 12.41 वर्षात दुप्पट होईल.

3/5

Post Office, Post Office Scheme, Post Office Saving Schemes,  post office small saving, small saving, marathi news, news in marathi

जर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस (Post Office) सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवल्यास पैसे दुप्पट होण्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागेल. कारण ते वार्षिक फक्त 4 टक्के व्याज देते, म्हणजेच तुमचे पैसे 18 वर्षांत दुप्पट होतील.

4/5

Post Office, Post Office Scheme, Post Office Saving Schemes,  post office small saving, small saving, marathi news, news in marathi

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) 15 वर्षांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. म्हणजेच, या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 10.14 वर्षे लागतील.

5/5

Post Office, Post Office Scheme, Post Office Saving Schemes,  post office small saving, small saving, marathi news, news in marathi

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Time Deposite) 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत 5.5 टक्के व्याज मिळत आहे. तुम्ही यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सुमारे 13 वर्षांत दुप्पट होतील. त्याचप्रमाणे, तुम्हाला 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.7 टक्के व्याज मिळत आहे. या व्याजदराने पैसे गुंतवले तर तुमचे पैसे सुमारे 10.75 वर्षांत दुप्पट होतील.