PM Modi : मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते राजा पटेरिया (Raja Pateria) यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजा पटेरिया यांनी कॉंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी तयार व्हा अशी सूचना केली. संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी तयार राहा, असे या कॉंग्रेस नेत्याने म्हटले आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणात बदला घेण्याची भावना


पन्ना येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मंत्री राजा पटेरिया म्हणाले की, "देशाचे संविधान वाचवायचे असेल आणि आदिवासींचे रक्षण करायचे असेल तर मोदींना मारायला तयार व्हा. आपल्या देशाच्या राजकारणात आता सौहार्द आणि बंधुभावाचा संबंध राहिलेला नाही. आता राजकारणात बदला घेण्याची भावना उघडपणे दिसू लागली आहे. राजकीय भाषेची पातळी सातत्याने घसरत आहे."


कॉंग्रेसचे स्पष्टीकरण


"राजा पटेरिया यांचे विधान नीट ऐका, त्यांना मारून नव्हे तर निवडणुकीच्या वेळी त्यांचा पराभव करून संविधान वाचवण्याविषयी बोलत होते. भाजपचे अनेक नेते, माध्यमे खोटी माहिती पसरवत आहेत," असे मध्य प्रदेश कॉंग्रेस सेवादलाने म्हटले आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडीओसुद्धा ट्विट केला आहे.


काय आहे व्हिडीओमध्ये?


"मोदी निवडणुका संपवून टाकतील. मोदी धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर विभाजन करतील. अल्पसंख्यांकांचे जीव धोक्यात आहे. संविधान वाचावायचे असेल तर मोदींची हत्या करायला तयार राहा. हत्या म्हणजे हरवण्याचे काम," असे राजा पटेरिया या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.



माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला - राजा पटेरिया


राजा पटेरिया युद्धाबाबत बोलून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पटेरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर काँग्रेस नेत्याने आता स्पष्टकरीण दिले आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. मी मोदींचा पराभव करण्याबाबत बोलत होतो असे पटेरिया यांनी म्हटले आहे.