Bengaluru Murder Case: दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती बेंगळुरुत झाली आहे. मल्लेश्वरममधील एका फ्लॅटमध्ये फ्रीजमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक म्हणजे, 29 वर्षीय तरुणीच्या मृतदेहाचे 30 तुकडे करण्यात आले आहेत. शनिवारी ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनुसार, महिलेची हत्या जवळपास 15 दिवस आधी करण्यात आल्याची शक्यता आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेंगळुरूमधील मल्लेश्वरम परिसरात एका इमारतीत महिलेची हत्या करण्यात आली असून तिच्या मृतदेहाचे 30 तुकडे करण्यात आले होते. तसंच, घरातील फ्रिजरमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात महिला एकटीच राहायची. महिलेचे नाव महालक्ष्मी असं असून तिचे लग्न हेमंत दास याच्यासोबत लग्न झाले होते. दोघही वेगवेगळे राहत होते. महिला एका मॉलमध्ये काम करत होती तर तिचा शहरापासून दूर असलेल्या एका आश्रमात काम करत होता. तिचा पती मुलीसह वेगळा राहत होता. पोलिस या प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून घरातून दुर्गंधी येत होती. त्यानंतर शेजाऱ्यांनी घरमालकाला याबाबत सांगितलं. तेव्हा घरमालकाने घराचा दरवाजा उघडला. तेव्हा आणखी तीव्र दुर्गंधी यायला सुरुवात झाली. घरमालकाने फ्रीजचा दरवाजा उघडला तेव्हा छिन्नविछिन्न अवस्थेत असलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. ते पाहून शेजारी चांगलेच हादरले. या घटनेची पोलिसांना लगेचच माहिती देण्यात आली. 


महिला तीन महिन्यांपूर्वीच येथे राहण्यासाठी आली होती. तसंच, तीचे मुळ गावदेखील दुसऱ्या राज्यात होते. महिलेची हत्या का करण्यात आली हे मात्र अद्याप उघडकीस आले नाहीये. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थळी डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक विशेष तज्ज्ञांनी देखील तपासणी केली आणि पोलिस तपास सुरू केला आहे. 


दरम्यान, 2022साली दिल्लीच्या मेहरौलीमध्ये श्रद्धा वालकर नावाच्या महिलेचीही अशीच हत्या करण्यात आली होती. तिची हत्या करण्यात आल्यानंतर मृतदेहाचे 36 तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धा वालकरची हत्या तिचाच प्रियकर आफताब पूनावाला याने केली होती. अफताब सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैद आहे. श्रद्धाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर अफताबला ताब्यात घेण्यात आले होते