पोपट पिटेकर, झी मीडिया,मुंबई : यंदा दिवाळी सण ऑक्टोबरमध्ये असताना बहुतांश ठिकाणी 4 ते 5 दिवसांची सुट्टी आहे. त्यामुळे काही ठिकाणे फिरण्याची ही उत्तम संधी आहे. ऑक्टोबरमध्ये तुम्ही भारतातील या ठिकाणांचे नियोजन करू शकता. ऑक्टोबर महिना असा आहे की तो फार उष्ण किंवा थंडही नाही. हे हवामान प्रवासासाठी योग्य आहे. अशा स्थितीत तुम्ही नॅशनल पार्कपासून ते पर्वत आणि साहसी ठिकाणांपर्यंत कुठेही फिरण्याचा प्लॅन करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिलाँग


शिलाँग (Shillong) हे मेघालयातील(Meghalaya) सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. सुंदर दृश्ये,(Beautiful views) पावसाचे हलके थेंब, उंचच उंच डेरेदार झाडे, अधून मधून वाहणाऱ्या दऱ्या, प्रत्येक गोष्ट त्याच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करते.त्यामुळे तुम्ही हे ठिकाण एकदा तरी पाहाच.


सिक्कीम


तुम्हाला काहीतरी नवीन आणि मनोरंजक पाहायच असेल तर सिक्कीममधील लाचेन (Sikkim in Lachen) हे सुंदर ठिकाण आहे. त्यामुळे उत्तराखंड, हिमाचल व्यतिरिक्त हे ठिकाण निवडू शकता. आजूबाजूला बर्फाच्छादित टेकड्या आणि दऱ्यांनी वेढलेले लाचेन हे ऑक्टोबरमध्ये भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे. थंगू व्हॅली,(Thangu Valley,)चोप्टा व्हॅली,(Chopta Valley) लाचेन मठ (Lachen Monastery) आणि लाचेनमधील गुरुडोंगमार तलाव तिथे जाऊन नक्की पाहा.


तामिळनाडू


हिरव्यागार पर्वतांनी सजलेल्या तामिळनाडूमधील कुन्नूरला (Tamil Nadu in Coonoor) भेट देण्याचे नियोजन या हंगामातील सर्वोत्तम ठरेल. दूरवर पसरलेले गवत आणि चहाच्या बागा (Tea gardens) पर्यटकांना आकर्षित करतात. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी तर सर्वोत्तम आहेच, शिवाय ट्रेकिंगच्या शौकिनांसाठीही हे ठिकाण एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही.


अरुणाचल प्रदेश


अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh)झिरो व्हॅलीचे (Zero Valley) नाव वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. जर तुम्हाला एखाद्या सुंदर आणि शांत ठिकाणी जाऊन सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल तर क्षणाचाही विलंब न करता या ठिकाणी जाऊ शकता. झिरो व्हॅलीमध्ये गेल्यावर एका वेगळ्याच जगात आल्यासारखे तुम्हाला वाटेल. तळी घाटी (Tali Valley) वन वन्यजीव, मेघना गुहा मंदिर (Meghna Cave Temple) आणि सिद्धेश्वर नाथ मंदिर (Siddheshwar Nath Temple) देखील जवळच आहे. जी पाहण्यासारखी सर्वोत्तम ठिकाणे आहेत.


हिमाचल प्रदेश


हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) स्पिती व्हॅली (Spiti Valley) हे उत्तम ठिकाण आहे. येथे पोहोचल्यावर तुम्हाला निसर्गाचे अनोखे नजारे पाहायला मिळतात. रंगीबेरंगी पर्वत, (Colorful mountains) डोक्यावर निरभ्र निळे आकाश आणि कोलाहलापासून दूर. उत्तर भारतात ऑक्टोबरमध्ये भेट देण्यासाठी स्पिती व्हॅली हे सर्वोत्तम ठिकाण आहे. नीलमणी-राखाडी स्पिती नदी, खोऱ्यातील वीट-मातीची घरे, हिरवीगार शेतं (Green fields) आणि विस्तीर्ण मठांमध्ये वेळ घालवण्याची एक वेगळीच मजा आहे.


केरळ


केरळमधील अलेप्पी (Kerala in Alleppey ) किंवा अलाप्पुझा (Alappuzha) हे राज्याचे वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळ मानले जाते. तुम्हाला एक्सप्लोर करण्यात जितका आनंद मिळेल तितकेच अलेप्पीमधील कालवे, तलाव आणि हाऊसबोट्सचे (Houseboats) शांत नेटवर्क तुम्हाला थक्क करेल. अलेप्पीची भव्यता पाहण्यासाठी समुद्रकिना-यावर देखील तुम्ही जाऊ शकता.  


या सर्व ठिकाणाचा तुम्ही नकी आनंद घ्या. आणि तुमचा सणासुदीचा हंगाम देशभरातील अनोख्या सहलीने साजरा करा.