मुंबई: जीएसटी त्रुटी, ई-वे बिलातील जाचक अटी याविरोधात अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हणजे कॅटने आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे.मुंबई शहर, उपनगरांसह संपूर्ण महानगर क्षेत्रातील सुमारे साडे तीन लाख व्यापारी, दुकानदार यात सहभागी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं म्हणजे सीएआयटीने या बंदची घोषणा केली आहे. व्यापारी, वाहतूकदार आणि कर व्यावसायिकांचा या बंदमध्ये सहभाग आहे. देशभरातील व्यापाऱ्यांचा विरोध हा तर्कसंगत आणि शांततापूर्ण असेल. 

होलसेल आणि किरकोळ बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांना या बंदमधून वगळण्यात आलं आहे, असं व्यापारी वर्गाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 



सातारा जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी आज सातारा बंद ची हाक दिली आहे. GST च्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व दुकानदार  सर्व व्यवहार बंद ठेवून या बंद मध्ये सहभागी झाले आहेत. 


मुकेश अंबानीच्या घराबाहेर असलेली 'ती' कार रिलायन्स कंपनीच्या नावावर


कोल्हापूरातील व्यापार आज बंद राहणार आहे. सराफ दुकान, धान्य व्यापार, कापड दुकानासह किराणा दुकानदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. जीएसटी कायद्यामध्ये आत्तापर्यंत 900 हून अधिक वेळा सुधारणा झाल्या.


राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या माध्यमातून जीएसटी कायदा जाचक केला आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात बंद मध्ये सहभागी व्हावे अस आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री वतीने करण्यात आलं होत. या बंदला व्यापाऱ्यांनी पण प्रतिसाद देत या आंदोलनात सहभागी झाले आहेत.