मुकेश अंबानीच्या घराबाहेर असलेली 'ती' कार रिलायन्स कंपनीच्या नावावर?

पोलिसांनी घातपाताचा कट उधळला

Updated: Feb 26, 2021, 03:36 PM IST
मुकेश अंबानीच्या घराबाहेर असलेली 'ती' कार रिलायन्स कंपनीच्या नावावर?

मुंबई : मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) घराजवळ सापडलेल्या कारबाबत आता पोलीस तपासाला वेग आला आहे. पोलिसांनी ९ प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत अधिक माहिती जमा करायला सुरूवात केली आहे. एटीएस आणि क्राईम ब्रँचच्या विविध टीम्सकडून कसून तपास केला जात आहे. दरम्यान कारमध्ये सापडलेल्या पत्रात अंबानी कुटुंबाला धमकी (Car Outside at Mukesh Ambani's House) दिल्याचं उघड झालं आहे.

अंबानींच्या सिक्युरिटी ताफ्यातल्या गाड्यांची चांगलीच माहिती जमा करून ही कार इथे उभी केल्याचं दिसून येतं आहे. धमकीचं पत्र मोडक्या तोडक्या इंग्लिश आणि हिंदीत लिहीलं आहे. ज्या बॅगेत हे पत्र होतं त्या बॅगेवर मुंबई इंडियन्स लिहीलं आहे.

मुंबईतल्या अल्टामाऊंट रस्त्यावरील मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं ठेवण्यात आलेल्या गाडीत वेगवेगळ्या नंबर प्लेट सापडल्या आहेत..तसेच गाडीत सापडलेल्या चिठ्ठीत घातपात करण्याची धमकीही देण्यात आली आहे. स्कॉर्पिओ गाडीवर असलेला MH01DK9945 हा नंबर रिलायन्स कंपनीच्या नावावर आहे. तसेच ही कार काही दिवसांपूर्वी विक्रोळीतून हरवल्याचं म्हटलं जात आहे. 

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची कार आढळून आल्यामुळे खळबळ माजली, या गाडीची बॉम्ब शोध पथकानं तपासणी केली. यातून २० जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या आहेत.  त्यामुळे या कारची कसून तपासणी करण्यात आली. स्फोटकं सापडल्यामुळे मोठा घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. गाडीच्या आत जिलेटिन काड्यांसोबत विविध नंबर प्लेट आणि एक चिट्ठीही सापडली आहे.

या चिठ्ठीत धमकी लिहिण्यात आलीय.  तर गाडीवर असलेल्या नंबर आणि मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांच्या नंबर मधील एका गाडीचा नंबर सारखाच आहे. घातपाताचा कट उधळून लावण्यात आलाय मात्र हा प्रकार कोणी केला याचा शोध घेतला जात आहे.