Bharat Jodo Yatra: काश्मिरी थंडी.. तुफान बर्फवृष्टी.. शेर-ए-कश्मीर स्टेडियमधला (Sher-e-Kashmir Stadium) कार्यकर्त्यांचा उत्साह.. अशा भारलेल्या वातावरणात भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) समारोप झाला. 7 सप्टेंबर 2022 ला तमिळनाडूतल्या कन्याकुमारीतून काँग्रेसची यात्रा सुरु झाली होती. रविवारी राहुल गांधींनी श्रीनगरला पोहोचताच ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा (Tiranga) फडकावला. अखेर पाच महिन्यांनी काश्मिरमध्ये या यात्रेचा समारोप झालाय. त्यामुळे आता कन्याकुमारी ते काश्मीर (Kanyakumari to Kashmir) यात्रेनं काँग्रेसचं (Congress) चित्र बदलणार ?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. (Bharat Jodo Yatra will make Rahul Gandhi the face of the opposition Will the picture of Congress change marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने लाल चौक सील करून सर्वसामान्य नागरिकांना परिसरात बंदी घालण्यात आली होती. राहुल गांधींसोबत त्यांची बहीण प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) दिसल्या. भारत जोडो यात्रेनं नेमकं काय साधलं? काँग्रेसला या यात्रेतून (Bharat Jodo Yatra) काय मिळालं?, असे अनेक अनेक प्रश्न ही यात्रा संपल्यानंतर उपस्थित झाले आहेत. 


कशी होती भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ?


12 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा पार पडली. 145 दिवस ही यात्रा चालली. 3970 किलोमीटरचं अंतर पायी पार करण्यात आलं. दररोज 25 किलोमीटरचं अंतर राहुल गांधींना यात्रेकरुंसोबत पार केलं. राहुल गांधी (Rahul Gandhi) जिथे असतील तिथे दररोज एक नवं गाव वसवलं जायचं. तसेच ट्रकवर ठेवण्यात आलेल्या जवळपास 60 कंटेनर्सद्वारे हे गाव थाटलं जायचं. त्यामुळे काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचं काम राहूल गांधी यांनी केलंय.


आणखी वाचा - Rahul Gandhi : राहुल गांधी यांचं लग्न ठरलं? स्वतःच सांगितले मनाजोग्या वधूचे गुण


यात्रेचं आकर्षण ठरलं ते राहुल गांधींचं वेगात चालणं आणि त्यांच्यासोबत यात्रेत सामील बडे आसामी.. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक बॉलीवूड स्टार्स, गायक, लेखक, पर्यावरणवादी यात्रेत राहुल गांधींसोबत चालताना दिसले. दिल्लीतल्या कडाकाच्या थंडीत केवळ टी-शर्ट (Rahul Gandhi T-Shirt) घालून चालणाऱ्या राहुल गांधींची देशभरात चर्चा झाली. 


दरम्यान, यात्रेला महाराष्ट्रासह (Maharastra) प्रत्येक राज्यात तुफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भारत जोडो यात्रा विरोधकांना जोडणार का? यात्रेनंतर राहुल गांधींचं 2024 साठीचं मिशन पूर्ण होणार का? यात्रेतून कार्यकर्त्यांना जो बूस्ट मिळालाय तो टेम्पो राहुल कायम ठेवू शकतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) वाट पाहावी लागेल.