इंटरव्ह्यूच्या बहाण्याने हॉटेलवर बोलवले; दारूच्या नशेत अभिनेत्रीवर बलात्कार
Raped On Bhojpuri Actress: गुरुग्राममधून भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. मुलाखतीदरम्यान आरोपी महेश पांडेंने मद्यपान करुन बलात्कार केल्याची घटना समोर आला आहे.
दिल्लीः एका भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्लीतील गुरुग्राम येथे एका हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. 29 जून रोजी ही घटना घडली आहे. पीडित तरुणीने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महेश पांडे असं आरोपीचे नाव आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, महेश पांडे नावाच्या आरोपीने कट रचत एका मुलाखतीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलवण्यात आले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली होती. हॉटेलमध्ये मुलाखतीच्या दरम्यान, महेशने दारु पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे वागणे पाहून मला थोडी शंका आली. त्यानंतर त्याने इंटरव्ह्यू बंद करण्यास सांगितले, असं पीडितेने म्हटलं आहे.
दारुच्या नशेत महेशने पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला पण विरोधाला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला, असं पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणात एसीपी क्राइम वरुण दहियाने म्हटलं आहे की, 19 जुलै रोजी 21 वर्षांच्या पीडितेने तक्रार दाखल केली होती. जूनच्या आसपास सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. महेश पांड्ये असं आरोपीचे नाव असून चकरपुर येथील रहिवाशी आहे.
सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर दोघांनी फोननंबर एकमेकांना दिले. त्यानंतर 27 जून रोजी त्यांच्यात बोलणे झाले होते. तेव्हाच 29 जून रोजी इंटरव्ह्ययू होइल हे निश्चित झाले होते. महेशने अभिनेत्रीला गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये बोलवले. त्यानंतर धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. हॉटेलच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.