नवी दिल्ली :  Delhi's Rohini court shootout : येथील न्यायालयात करण्यात आलेल्या गोळीबाराने राजधानी हादरली आहे. रोहिणी न्यायालयाच्या आवारात जोरदार गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार गॅंगवॉरमधून झाल्याचे सांगण्यात येत आहे. ( Firing in Delhi’s Rohini court) गुंड जितेंद्र गोगी  (Gangster Jitender Gogi) याला शुक्रवारी दुपारी सुनावणीसाठी येथे आणले जात असताना हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात गोगी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत हल्लेखोरांनाही ठार केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात (Rohini Court) गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात 3 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. त्यापैकी एक जितेंद्र गोगी आहे, तर जितेंद्रवर हल्ला करण्यासाठी आलेले दोन हल्लेखोर आहेत. सांगितले जात आहे की हल्लेखोर वकिलांच्या वेशामध्ये आले होते. विशेष म्हणजे, गुंड जितेंद्र गोगी तिहार तुरुंगात होता, त्याला शुक्रवारी सुनावणीसाठी आणण्यात आले होते. 


दिल्लीच्या रोहिणी न्यालयात गुंड जितेंद्र तथा गोगी याला आणण्यात आले होते. यावेळी गोळीबार करण्यात आला. यावेळी दोघांचा मृत्यू झाला तर गोगीला गोळी लागल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्याचाही या गोळीबारात मृत्यू झाला आहे. वकिलांच्या वेशात गुंड न्यायालय परिसरात आले होते. त्यांनी केलेल्या गोळीबारात गँगस्टर गोगीला गोळी लागली.