SBI च्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! आता मुदत ठेवींवर मिळणार भरघोस परतावा
state bank of india latest news : जर तुमचे खाते देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई : जर तुमचे खाते देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. SBI ने शनिवारी (15 जानेवारी) मुदत ठेवी म्हणजेच FD चे व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. अलीकडेच खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेनेही (HDFC Bank) एफडीचे व्याजदर वाढवले आहेत.
एसबीआयच्या संकेतस्थळानुसार, बँकेने एक वर्ष किंवा त्याहून अधिक आणि दोन वर्षांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने या कालावधीतील एफडीवरील व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे. आता SBI एक वर्ष किंवा त्याहून अधिक आणि दोन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या मुदत ठेवींवर 5 टक्क्यांऐवजी 5.1 टक्के व्याज देईल.
नवीन दर 15 जानेवारी 2022 पासून लागू
नवीन दर शनिवारपासून (15 जानेवारी 2022) लागू झाले आहेत. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी आहेत. तसेच एक वर्ष किंवा त्याहून अधिक आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर, ज्येष्ठ नागरिकांना आता 5.50 टक्क्यांऐवजी 5.6 टक्के अधिक मिळणार आहेत. विशेष बाब म्हणजे बँकेने इतर मुदतीच्या एफडीच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.
sbi raised interest rates on fix deposits