Share Market Live Update: कालच्याप्रमाणे शेअरमार्कटची स्थिती आजही डाऊन आहे. भारतीय शेअर बाजारात (Share Market Today) मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीचा रंग आज लाल होता. दोन्हीकडे त्यांचा बाण हा घसरलेला आहे.  पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, बीएसई (BSE) चा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स (Sensex) सुरुवातीच्या व्यवहारात 211.76 अंकांनी घसरून 61,768.96 वर आला. एनएसई (NSE) चा निफ्टी (Nifty) 57.95 अंकांनी घसरून 18,351.70 वर आला. (big update share market falls down today see the sensex and nifty points)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय होती कालची स्थिती? 
सेन्सेक्समध्ये 300 अंकांनी घसरण झाली आहे. तर निफ्टीही वेगानं खाली कोसळतो आहे. आजच्या बुधवारच्या व्यवहारात BSE 30 चा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) हा 164.36 अंकांनी म्हणजेच 0.27 टक्क्यांनी घसरून 61, 708.63 वर पोहचला आहे. तर NSE 50 चा निर्देशांक निफ्टी (Nifty) 5.15 अंकांवरून घसरून 18.398.25 वर पोहचला आहे. सध्या बाजार कोसळला असला तरी ऑटो, मीडिया, फार्मा, पीएसयू बँक निर्देशांकात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसत आहे. मंगळवारी सेन्सेक्स 30 283 अंकांच्या वाढला होता आणि 61.907 वर बंद झाला होता. निफ्टी 74 अंकांच्या वाढीसह 18,403 वर बंद झाला होता. 


हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा


पाच दिवसांपुर्वीच होती तेजी... पण आता? 
5 दिवसांपुर्वी म्हणजेच 11 नोव्हेंबरला शेअर मार्केटमध्ये फार (Share Market Rises Today) मोठी उसळी पाहायला मिळाली होती. तेव्हा गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी निर्माण झालेली. जगातील मंदीच्यी पाश्वभुमीवर दिसणारा हा बदल प्रचंड सकारात्मक होता. परंतु आजच आलेल्या बातमीनुसार शेअर मार्केट चांगलंच कोसळलं आहे. 


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल


शेअर बाजारात (Share Market Latest News) मोठी उसळी पाहायला मिळाली. सध्या जगावर मंदीचं आणि महागाईचं (Global Recession 2023) वातावरण आहे. त्यामुळे हा बदल विशेष होता. सेन्सेक्स (Sensex) 1 हजार अंकांनी वधारला होता तर निफ्टी (Nifty) 286 अंकांनी वधारला होता. सध्या रूपया आणि डॉलर (Rupees Vs Dollar) यामध्येही एक वेगळीच झुंज पाहायला मिळाली होती. 


कशात तेजी, कशात मंदी? 
सेन्सेक्स पॅकमधून (Sensex Pack) टायटन, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती हे सुरुवातीच्या व्यापारात पिछाडीवर होते.