बिहार निकाल : बिहार विधानसभेच्या 243 पैकी 229 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. एनडीए आणि महाआघाडी यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत होती. काही वेळेतच निकाल जाहीर होणार आहे. पण निवडणूक आयोगाने 229 जागांचा निकाल जाहीर केला आहे. ज्यामध्ये एनडीए बहुमताकडे पोहोचताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपडेट रात्री 1.20 मिनिटांनी


बिहारच्या 229 जागांचा निकाल जाहीर
एनडीए - 116 जागांवर विजयी
महाआघाडी - 105 जागांवर विजयी
एमआयएम - 5 जागांवर विजयी
बसपा - 1, एलजेपी 1, अपक्ष - 1 जागा


बिहारमध्ये काही जागांचा निकाल काही वेळेतच जाहीर होणार आहे. एनडीए बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे.



रात्री 9 वाजेपर्यंतचा निकाल खालील प्रमाणे


भाजप - 28
आरजेडी - 25
जेडीयू - 17
काँग्रेस - 7
सीपीएल - 6
वीआयपी - 2
एमआयएम - 2
सीपीआय-एम - 1
हम - 1
अपक्ष - 1


कांटे की टक्कर सुरु असताना आता फक्त 50 लाख मतांची मोजणी बाकी आहे. एनडीए सध्या 123 जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे.


2 जागांवर 200 पेक्षा कमी मतांचं अंतर 
6 जागांवर 500 पेक्षा कमी मतांचं अंतर 
6 जागांवर 1000 पेक्षा कमी मतांचं अंतर 
13 जागांवर 2000 पेक्षा कमी मतांचं अंतर 
19 जागांवर 3000 पेक्षा कमी मतांचं अंतर 
37 जागांवर 5000 पेक्षा कमी मतांचं अंतर