लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी उमेदवार अर्चना गौतम यांचा पराभव झाला आहे. हस्तिनापूरमधून त्या काँग्रेसकडून निवडणूक लढवत होत्या. मिस इंडिया बिकिनी राहिलेल्या अर्चना गौतम यांचा भाजपचे दिनेश खटिक आणि समाजवादी पक्षाचे योगेश वर्मा यांच्याशी सामना होता. अर्चना गौतप यांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसनं मिस इंडिया बिकिनी अर्चना गौतमला (Archana Gautam)हस्तिनापूरच्या रणसंग्रामात उतरवलं  होतं. भाजपचे विद्यमान आमदार दिनेश खटिक यांनी काँग्रेसची अर्चना गौतमचा पराभव केला आहे. अर्चना गौतमला उतरवणं ही काँग्रेसची चीप पब्लिसिटी आहे, असा भाजपचा आरोप होता. तर एका अभिनेत्रीला राजकारणात येण्याची संधी म्हणून काँग्रेस अर्चनाच्या उमेदवारीचं समर्थन करत होती.



अर्चना गौतमबद्दल थोडक्यात 


अर्चना गौतम मास कम्युनिकेशनमध्ये पदवीधर आहे. अर्चनाने २०१४ मध्ये मिस यूपी हा किताब जिंकला. त्यानंतर तिने  २०१८ मध्ये ती मिस बिकीनी इंडियाचा मान पटकावला.  प्रियंका गांधींपासून प्रेरणा घेत राजकारणात आल्याचं अर्चना गौतम सांगते.