Man Circulated Daughter Private Videos: कर्नाटकमधील उडपी येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. येथील एका महिलेने तिच्याच पतीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्याच मुलीचे खासगी व्हिडीओ पतीने व्हायरल केल्याचा धक्कादायक आरोप या महिलेने केला आहे. पीडित तरुणी 18 वर्षांची असून तिच्या आईने 13 जुलै रोजी पोलिसांकडे पतीविरोधात लेखी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांनी केलेला प्रकार समोर आल्यानंतर या तरुणीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने ती वाचली.


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणीने फिनाईल प्यायल्याच लक्षात आळ्यानंतर तिला उडपी शहरामधील सरकारी रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं. या तरुणीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आता ती सुखरुप आहे. या तरुणीच्या आईने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये, आरोपीला त्याच्या मुलीचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. या तरुणीचे तिर्थहल्ली येथे राहणाऱ्या त्यांच्याच नात्यातील एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध आहेत, असं तिच्या आईनेच तक्रारीमधील तपशीलामध्ये म्हटलं आहे. आरोपीने मुलीच्या प्रियकराला घरी बोलावलं. त्यानंतर त्याने या तरुणाला बेदम मारहाण केली. मुलीच्या प्रियकराच्या फोनमधून आरोपीने बळजबरीने मुलीने पाठवलेले खासगी व्हिडीओ आणि फोटो डाऊनलोड करुन स्वत:कडे घेतले. 


...म्हणून व्हायरल केले स्वत:च्याच मुलीचे खासगी व्हिडीओ


मात्र मुलीने केलेला हा प्रकार न पटल्याने तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने या व्यक्तीने स्वत:च्याच मुलीचे खासगी व्हिडीओ व फोटो आपल्या अकाऊंटवरुन सोशल मीडियावर पोस्ट केले. तसेच ते जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहचतील तितके फॉरवर्ड ही केले. यानंतर माझ्या पतीने मला आणि माझ्या मुलीला बेदम मारहाण केली, असंही तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितलं आहे. नवऱ्याने केलेल्या मारहाणीमध्ये ही महिला आणि तिची पिडीत मुलगी जखमी झाले.


मुलीने केला आत्महत्येचा प्रयत्न


वडिलांनी त्यांच्या ओळखीतील आणि आपल्यालाही ओळखणाऱ्या लोकांना आपले खासगी व्हिडीओ आणि फोटो पाठवल्याने आपण कोणालाही तोंड दाखवण्यास लायक राहिलेलो नाही अशी भावना मनात निर्माण झाल्याने या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. 12 जुलै रोजी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ती बचावली. यानंतर या तरुणीच्या आईने सीआयएन पोलीस स्थानकामध्ये पतीविरुद्ध तक्रार दाखल केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या या प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत.