नवी दिल्ली: राजस्थानमधील घोडेबाजारासाठी महाराष्ट्र भाजपने ५०० कोटी रुपये जमा करुन दिले, असा आरोप करणाऱ्यांनी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करुन घ्यावी, अशी खोचक टिप्पणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस सुरु होणार, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'शी खास संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी सध्या कोरोना हाच आमचा फोकस आहे. ऑपरेशन लोटसमध्ये आम्हाला कोणताही रस नाही, हे स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता परत येण्याचं लॉलीपॉप दाखवतायंत'


तसेच राजस्थानमधील घोडेबाजारासाठी महाराष्ट्र भाजपने ५०० कोटी रुपयांची रसद पुरवल्याचा आरोप करणाऱ्यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले. हा दावा करणाऱ्यांनी एकदा डॉक्टरकडे जाऊन स्वत:ला तपासून घ्यावे, असे फडणवीस यांनी म्हटले. 


महाविकासआघाडीत काँग्रेसला कोणी विचारतं तरी का?; यशोमती ठाकुरांवर भाजपचा पलटवार


तसेच भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनाही फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने अगोदर तिघाडी सांभाळावी. तसेच स्वत:चा पक्ष वाचवावा. मुळात महाराष्ट्रातील सरकार जनतेने निवडून दिलेले नाही. तरीही ज्या कामासाठी एकत्र आला आहात ते काम करावे. भाजप पक्ष मजुबत आहे. ज्यांना काम नाही तेच फोडाफोडीच्या चर्चा करत असल्याची टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली.