एका सेकंदात टोपी उतरवून टाकेन, भाजप नेत्याची इन्स्पेक्टरला धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्तेत भाजप नेत्यांची दादागिरी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. नुकतंच मुरादाबादच्या डिलारी ब्लॉकमध्ये एका भाजप नेत्याच्या मुलानं ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला टोपी उतरवण्याची धमकी देऊन टाकली.
मुरादाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्तेत भाजप नेत्यांची दादागिरी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. नुकतंच मुरादाबादच्या डिलारी ब्लॉकमध्ये एका भाजप नेत्याच्या मुलानं ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला टोपी उतरवण्याची धमकी देऊन टाकली.
भाजप नेता राजपाल सिंह यांचा मुलगा अमित चौहान यानं ड्युटीवर तैनात असलेल्या इन्स्पेक्टर आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना 'एका सेकंदात टोपी उतरवून टाकेन' अशा शब्दांत धमकावलं. या दरम्यान अमित चौहाननं हे भाजपचं सरकार असल्याची आठवणही पोलिसांना करून दिली. एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडलीय. ही घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एसएसपींनी या घटनेच्या अधिक चौकशीचे आदेश दिलेत.
'जर पोलीस स्टेशनमध्ये काही चुकीचं घडत असेल तर मला पुरावे द्या... एका सेकंदात यांची आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची टोपी उतरवून टाकेन. हे भाजपचं सरकार आहे' असं म्हणताना अमित चौहान या व्हिडिओत दिसत आहेत.