जयपूर : विधानसभा निवडणुकीआधी भाजपला राजस्थानमध्ये धक्का बसला आहे. राज्यातील दिग्गज नेते आणि माजी शिक्षण मंत्री घनश्याम तिवारी यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. घनश्याम तिवारी अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर नाराज होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहून राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि केंद्रातील मुख्य नेत्यांना यासाठी जबाबदार धरलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिवारी यांनी आरएसएस सोबत अजूनही असल्याचं म्हटलं आहे. घनश्याम तिवारी यांनी म्हटलं की, 'ते काँग्रेस आणि भाजपमधील चांगल्या नेत्यांना त्यांच्या पक्षात घेतील. आगामी विधानसभा निवडणुकीत ते सांगानेर येथून त्यांचा नवा पक्ष भारत वाहिनी पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढतील. भारतीय जनता पक्षाचे 15 पेक्षा अधिक आमदार त्य़ांच्या संपर्कात आहेत. आगामी निवडणुकीत ते भारत वाहिनी पक्षाकडून निवडणूक लढवतील.'



घनश्याम तिवारी यांनी पुढे म्हटलं की, 'खींवसर येथून अपक्ष आमदार हनुमान बेनीवाल त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. भविष्यात त्यांना देखील सोबत घेतलं जाईल.
राजस्थानच्या लोकांनी काँग्रेसला कंटाळून भाजपला सत्ता दिली. लोकसभेतही 25 जागा भाजपला लोकांनी दिल्या. पण आज राज्यातील जनता फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करत आहे.'