भाजप खासदाराकडून पंचकुला हिंसाचाराचं समर्थन?
नेहमी वादग्रस्त विधानं करण्यासाठी प्रसिद्ध असलेले खासदार साक्षी महाराज यांनी पंचकुलामधल्या हिंसाचाराचं लाजीरवाणं समर्थन केलं आहे.
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या हल्ल्याचा निषेध करत असताना, त्यांच्याच पक्षाच्या एका खासदारानं मुक्ताफळं उधळली आहेत. नेहमी वादग्रस्त विधानं करण्यासाठी प्रसिद्ध असलेले खासदार साक्षी महाराज यांनी पंचकुलामधल्या हिंसाचाराचं लाजीरवाणं समर्थन केलं आहे.
एका महिलेच्या तक्रारीवरून शिक्षा केली जाते आणि लाखो अनुयायांच्या भावनांची मात्र दखल घेतली जात नाही, असा सूर त्यांनी लावला आहे. हिंदू धर्माला बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याची नेहमीची तक्रारही ते करतायत. संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांनी या हिंसेचा निषेध केला आहे.