नवी दिल्ली: नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा निर्णय फिरवल्यानंतर दिल्लीतील राजकीय वातावरण अपेक्षेप्रमाणे तापले आहे. या वादात आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी उडी घेतली आहे. सिसोदिया यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले की, भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणून त्यांना दिल्ली सरकारचा निर्णय बदलायला लावला. त्यामुळे आता राज्यातील सरकारी रुग्णालयांत दिल्लीकरांना प्राधान्य मिळणार नाही. भाजप कोरोनाच्या मुद्द्यावरही राजकारण का करु पाहत आहे? भाजप दिल्ली सरकारची धोरणे बदलू पाहत आहे, असा आरोप सिसोदिया यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची प्रकृती बिघडली, कोरोना टेस्ट करणार

अरविंद केजरीवाल यांनी नुकताच राज्यातील सरकारी रुग्णालयांत केवळ दिल्लीकर नागरिकांवरच उपचार होतील. राज्याबाहेरील लोकांना सरकारी रुग्णालयात भरती केले जाणार नाही, असा आदेश काढला होता. 
दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास येथील नागरिकांना रुग्णालयात खाटा उपलब्ध असाव्यात म्हणून आम्ही जाणुनबुजून बाहेरच्या राज्यातील लोकांना सरकारी रुग्णालयांत उपचाराची सुविधा न देण्याचा निर्णय घेतला होता. आगामी काळात किती खाटा लागतील, याचे नियोजन करुन हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता नायब राज्यपालांनी हा निर्णय बदलला. मग आता दिल्लीकरांना रुग्णालयात पुरेसे बेडस कसे उपलब्ध होणार, असा सवाल सिसोदिया यांनी नायब राज्यपालांना विचारला. 




दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांनी केजरीवालांचा 'तो' निर्णय बदलला