प्रभावी Sputnik V सोबत बुस्टर डोस, डेल्टा वेरिएंटवरही वार करण्याचा दावा
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी देशात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे.
मुंबई : कोरोना विरुद्ध लढण्यासाठी देशात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. आतापर्यंत अनेकांनी कोरोनाची लस घेतली आहे. रशियातील कोरोना वॅक्सीन निर्माता कंपनी गमालेया रिसर्च इंस्टिट्यूटने नवा दावा केला आहे. या दाव्यानुसार, कंपनी Sputnik V लसीचं बूस्टर डोस (Sputnik V Booster dose) लॉन्च करत आहे. (Booster dose will be available with Russian vaccine Sputnik V will also attack Delta variant)
बूस्टर डोसंचं कॉकटेल
ही वॅक्सीन भारतात सर्वात आधी आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या डेल्टा वेरियंटवर परिणामकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीनुसार, या बूस्टर डोसची निर्मिती ही कॉकेटलद्वारे बनवण्यात आले आहे. डेल्टा वेरियंट भारतासह जगभरात वेगाने पसरत आहे. यामध्ये ब्रिटेन, अमेरिका व्हिएतनामसारख्या देशांचा समावेश आहे.
सर्दी-खोकला ज्यामुळे होतो त्या adenovirus वर ही वॅक्सीन आधारित आहे. या लसीची निर्मिती आर्टिफिशियल पद्धतीने करण्यात आली आहे. ही लस कोरोना व्हायरस SARS-CoV-2 मध्ये आढळणाऱ्या स्ट्रक्चरल प्रोटीनचं प्रतिरुप आहे.
वर्षाअखेरीस 10 कोटी डोस
Sputnik V लसीचा वापर भारतासह विविध देशांमध्ये केला जात आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी भारत सरकारने दुसऱ्या लाटेदरम्यान स्पुटनिक व्ही लसीला परवागनी दिली होती. भारतात स्पुटनिक व्हीचं निर्मिती हैदराबाद स्थित डॉ रेड्डीज लॅबमध्ये केली जात आहे. वर्षाअखेरीस कंपनीने स्पुटनिक व्हीच्या 10 कोटी डोसची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात आणखी 9 शहरांमध्ये Sputnik V उपलब्ध
डॉ. रेड्डीज लॅबने दिलेल्या माहितीनुसार, Sputnik V या लसीचे डोस देशातील आणखी 9 शहरांमध्ये उपलब्ध होणार आहेत. यामध्ये दिल्ली, बंगळुरु, मुंबई, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टनम, बद्दी, कोल्हापूर आणि मिर्यालगुडाचा समावेश आहे.
Sputnik V ची निर्मिती करणाऱ्या गामालेया रिसर्त सेंटरने मॉस्को स्ट्रेन विरुद्ध लस प्रभावशील असण्याबाबत अभ्यास करत आहे. रशियात सरकारच्या वतीने नव्या स्ट्रेनबाबत जनतेत जनजागृती केली आहे. या लसीच्या निर्मात्यांना विश्वास आहे की, ही वॅक्सीन नव्या वॅरियंट विरुद्ध प्रभावशील ठरेल.
संबंधित बातम्या :
६ वर्षाच्या मृत मुलाला कवटाळून आईचा जीवघेणा हंबरडा...आणि नियतीनेही मागे वळून पाहिलं...
CORONA : तिसऱ्या लाटेचा धोका? राज्याच्या कोविड टास्क फोर्सचा इशारा