Earthquake in Delhi-NCR: उत्तर भारत भूकंपाने हादरला, दिल्लीसह काश्मिरमध्येही तीव्र धक्के
उत्तर भारत (North India) भूंकपाच्या (Earthquake) तीव्र धक्क्याने हादरला. दिल्ली-एनसीआरसह (Delhi-NCR) काश्मिरमध्ये (Kashmir) भूकंपाचे धक्के
Earthquake in North India : उत्तर भारत (North India) भूंकपाच्या (Earthquake) तीव्र धक्क्याने हादरला. दिल्ली-एनसीआरसह (Delhi-NCR) काश्मिरमध्ये (Kashmir) भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात (Afghanistan) असल्याचे सांगण्यात येत आहे. भूंकपाची तीव्रता 5.9 रिश्टल स्केल (Richter scale) इतकी नोंदवली गेली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये जमिनीपासून 200 किमी खाली होता.
संध्याकाळी 7 वाजून 56 मिनिटांनी भूकंपाचे हदारे बसले. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधीही दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. दिल्लीत गेल्या एका आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला. उत्तर भारताबरोबरच पाकिस्तान, अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले.
नव्या वर्षाच्या पहिल्याच रात्री दिल्ली-एनसीआरमध्ये 3.8 रिश्टल स्केल भूकंपाचा धक्का जाणवला होता. हरियाणातल्या झज्जर इथे भूकंपाचा केंद्रबिंदूची नोंद करण्यात आली होती. जमिनीपासून 5 किलोमीटर खाली भूकंपाचा धक्का जाणवला. याआधी 12 नोव्हेंबरला दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या धक्क्याने हादरली होती. यावेळी भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी होती, आणि याचा केंद्र बिंदू नेपाळ होता.
दिल्ली-एनसीआर हा भूंकप संवेदनशील परिसर मानला जातो. तीव्र भूकंपा आल्यास इथे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होऊ शकते. त्यातच आता आठवडाभरात दुसऱ्यांदा भूकंपाचा हादरा बसल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावण पसरलं आहे.