Bride Gave Birth To A Child After 10 Days Of Marriage: लग्नाच्या (Wedding) दहा दिवसांतच नवविवाहितेने (Bride) एका मुलीला जन्म दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने पतीला (Husband) धक्काच बसला आहे. उत्तर प्रदेशमधील (UttarPradesh)  कानपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, नवविवाहितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. नेमका काय प्रकार आहे? 

दहा दिवसांपूर्वी झालं लग्न


कानपूर येथे राहणाऱ्या एका तरुणीचे १५ मे रोजी भोगनीपुर येथे राहणाऱ्या तरुणासोबत झाले होते. लग्नानंतर चार दिवसांत नवविवाहिता तिच्या माहेरी आली होती. २५मे रोजी तिच्या पोटात दुखायला लागलं. दुखणं असह्य झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. 

रुग्णालयात मुलीला जन्म


रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले. प्रसूती वेदना होत असल्याने तरुणीने २६ मे रोजी एका मुलीला जन्म दिला. मात्र, मुलगी जन्मतःच अशक्त असल्याने काहीच वेळात तिचा मृत्यू झाला. पत्नीने मुलीला जन्म दिल्याचे कळताच तिच्या पती व सासरच्या मंडळींना धक्काच बसला. 

 


पत्नीला स्वीकारण्यास नकार


पती व सासरची मंडळी तातडीने रुग्णालयात आले. त्यानंतर तरुणीसोबत घडलेली घटना ऐकून त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली. त्यानंतर नवविवाहितेच्या पतीने तीला स्वीकारण्यास नकार दिला आहे. 

 

तरुणीसोबत काय घडलं?

 

तरुणीवर गावातीलच अरुण पाल आणि विनय पाल यांनी बलात्कार केला होता. तसंच, अतिप्रसंगानंतर तिला धमकीही देण्यात आली होती. तरुणीने मुलीच्या जन्मानंतर ही माहिती पोलिसांनी सांगितली आहे. ६ जून रोजी पीडितेच्या सांगण्यावरुन पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात बलात्कार व जीवे मारण्याची धमकी देणे याअंतर्गंत तक्रार दाखल केली आहे. 

 


 

 

आरोपी फरार

 

पोलीस निरीक्षक समर बहाद्दुर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण व विनय पाल यांच्याविरोधात ३७४-D, ५०६ आणि ३(२)अंतर्गंत तक्रार दाखल केली आहे. तर, पीडितेला मेडिकल चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर, आरोपी सध्या फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून छापेमारी करण्यात येत आहे.