मुंबई : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर आपल्याला रोज नव-नवीन कंटेन्ट पाहायला मिळतात. ज्यामुळे लोकांचे मनोरंजन होत असतं. लग्न समारंभाचे व्हिडीओ पाहून आपण अनेकदा आपल्या जुन्या आणि आनंदी आठवणींना उजाळा देतो. यामुळेच कोणत्याही लग्न समारंभात व्हिडीओग्राफर प्रत्येक महत्त्वाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद करतो. सध्या या लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये भरमंडपात बसलेल्या वधू आणि वराची खास झलक कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये असे दिसते की नवरा-नवरी भरमंडपात रोमँटिक होताना दिसत आहेत. एकीकडे लग्नाच्या विधी सुरू आहेत, तर नवरा-नवरीचे लक्ष एकमेकांकडे लागले आहे. दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहाताना दिसत आहे. तर वधू-वराचे इशारे पाहून त्यांच्या मागे बसलेली एक महिला त्यांच्याकडे पाहाताना दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओ अधिकृत bridal lehenga designn  इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. आतापर्यंत हजारांहून अधिक लोकांनी इंस्टाग्राम व्हिडीओला लाईक केले आहे. यूजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट देखील करत आहेत.


गेल्या काही दिवसांपासून लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नववधु आणि नवरदेवांचे अनेक पारंपारिक प्रसंग किंवा अनेक किस्से कॅमेऱ्यात कैद होत असतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल खूप पसंत केले जातात.