Crime news : आपलं लग्न (Marriage) कसं धुमधडाक्यात करायचं, असं अनेकांचं स्वप्न असतं. आपल्या जोडीदाराविषयी सर्वांना काही ना काही अपेक्षा असतात. अनेकजण लग्नाआधीच हनिमूनचे (first night honeymoon) तसेच पोराबाळांचे स्वप्न रंगवतात. मात्र, लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीने धोका दिला तर? अशीच काहीशी घटना आता समोर आली आहे. या घटनेची सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा होत असल्याचं दिसून आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भागलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं 21 मे रोजी गावात एका मुलाचं लग्न झालं. मुलानं वधूला लग्न करून संसार थाटण्यासाठी घरी आणलं आणि लग्नानंतरचं प्लॅनिंग करू लागला. त्यानंतर त्याला असा काही धोका मिळाला, त्याची कल्पना वऱ्हाड्यांनी देखील केली नसेल. सध्या हे प्रकरण पोलिसात गेलं असून पोलीस कसून तपास करत असल्याचं दिसतंय.


लग्न झालं, वऱ्हाडी आपापल्या घरी गेले. घरातील पाहुणे मंडळी थकून झोपी गेले. त्याचवेळी नवी नवरी वेगळा प्लॅन रचत होती. रात्रीच्या सव्वा दोन वाजता नवरी आणि दबक्या पावलांनी बॉयफ्रेंडसोबत फरार झाली. एवढंच नाही तर नवरी घरातील 1 लाख 40 हजार रुपये घेऊन पळून गेली.  एवढंच नाही तर लग्नात मिळालेल्या गिफ्टवर देखील हात साफ केला. सकाळी आळस देत घरातील नातेवाईकांना हे प्रकरण समजल्यावर नवरदेवासकड सर्वांनी डोक्याला हात लावला. बिहारच्या भागलपूरमधील ही घटना आहे.


आणखी वाचा - Crime News : पुणे शहरात Interview देण्यासाठी आलेला तरुण रेल्वे स्टेशनवरुन बेपत्ता; CCTV फुटेजमध्ये महत्वाचा पुरावा


दरम्यान, हाताची मेहंदी अजून निघाली नाही, तोपर्यंत नव्या नवरीने रंग दाखवले आणि फरार झाली. या सर्व प्रकाराचा नवरदेवाला मात्र चांगलाच धक्का बसला आहे. मम्मीसोबत ती खूप चांगली बोलत होती, मला वाटलं देखील नव्हतं की, ती एवढा मोठा कांड करेल, असं म्हणत पतीने राग व्यक्त केला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी त्यांची हाती सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video) लागलं आहे. त्यामध्ये वधू क्रेटा गाडी घेऊन पळून जाताना दिसते. सध्या पोलीस या गाडीचा तपास करत आहेत.