Employment News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) बेरोजगारी (Unemployment) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. योगी सरकार (Yogi Adityanath Government) रोजगार निर्मितीची आश्वासनं देत असलं तरी राज्यातील स्थिती मात्र वेगळी असल्याचं दिसत आहे. याचं कारण सरकारी नोकरीसाठी दहावी उत्तीर्ण अट असताना उच्चशिक्षित तरुणदेखील अर्ज करत आहेत. शिपाई, वॉचमन, माळीच्या पोस्टसाठी बीटेक (BTech), एमटेक (MTech), एमबीए(MBA) शिकलेल्या तरुणांनी अर्ज केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचारी निवड आयोगाच्या प्रमुख भरती परीक्षांपैकी एक असणाऱ्या मल्टी टास्किंग स्टाफ (MTS नॉन-टेक्निकल) आणि हवालदार (केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स) 2022 साठी सुमारे 55 लाख 21 हजार 917 उमेदवारांनी अर्ज केला आहे. ऑनलाइन फॉर्म भरत हे अर्ज करण्यात आले आहेत. यापैकी 19 लाख 4 हजार 139 अर्जदार उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रयागराजच्या SSC मध्यवर्ती क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आहेत.


SSC कडून 10 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी भरती


मिळालेल्या माहितीनुसार, SSC ने 20-22 साठी जवळपास 10 हजार 880 आणि हवालदार सीबीएसई अॅँड सीबीएनच्या 529 पदांसाठी 18 ते 24 जानेवारीदरम्यान अर्ज मागवले होते. याची टिअर I परीक्षा 2 मे रोजी सुरु झाली असून, 20 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. 


55 लाखांपेक्षा जास्त अर्ज


केंद्र सरकारच्या कार्यालयात एमटीएस अंतर्गत चतुर्थ श्रेणीतील पदांची भरती केली जाते. या भरतीसाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणं पात्र आहे. मात्र या पदांसाठी चक्क बीटेक (BTech), एमटेक (MTech), एमबीए(MBA), बीबीए (BBA), एमसीए (MCA), बीसीए (BCA), बीएड (BEd), एलएलबी (LLB), एमएससी (MSC) पदवी घेणाऱ्या उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. 


केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये देशभरातील 55 लाखांहून अधिक बेरोजगार शिपाई, वॉचमन, जमादार, माळी, द्वारपाल होण्यासाठी रांगेत उभे आहेत.