नवी दिल्ली : २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या  विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.  त्यानुसार २७००० किलोमीटर इलेक्ट्रॉनिक रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच ५५० रेल्वे स्टेशन्सवर वायफाय उभारणार येणार आहे. तर सोलर पॉवर रेल्वे ट्रॅकजवळून उभारण्यात येणार आहे. तर चार रेल्वे स्टेशन पुनर्विकास प्रोग्राम पीपीपी मॉडेलवर असणार आहे. तेजस सारख्या आणखी ट्रेनने पर्यंटन स्थळे जोडण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड सुरु करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील रेल्वेला चालना देण्यासाठी काम करण्यात येत आहे. त्यासाठी २७ हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. तसेच सौर ऊर्जा ग्रीड रेल्वे ट्रॅकचीही निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामणे यांनी अर्थसंकल्प सादर करताना लोकसभेत दिली.


पीपीपी तत्त्वानुसार १५० रेल्वे गाडय़ा चालविण्यात येतील. १४८ किमी. बंगळुरु उपनगरीय रेल्वे यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १८ हजार ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकार २५ टक्के रक्कम देईल. ५५० रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्यात.


२०२४ पर्यंत ६ हजार किमी हायवे तयार करण्याचे उद्दीष्ट आहे. २५०० किमी. एक्स्प्रेस हायवे आणि ९००० किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडोर उभारणार येणार आहे. तसेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे, चेन्नई-बंगळुरु एक्स्प्रेस लवकरच तयार होईल, अशीही त्यांनी यावेळी माहिती दिली.


बँकांसाठी ही घोषणा


- सरकारी बँकांची अवस्था ठीक आहे, ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत
- सिडबी बँकेसह अॅक्सिस बँक १००० कोटींची योजना आणणार आहे
- आयडीबीआय बँकेचा हिस्सा हळूहळू विकला जाणार आहे
- बँक बुडली तर पाच लाख मिळतील
- खासगी बँकांमध्ये देखरेखीचे कठोर नियम ग्राहकांच्या ठेवी भांडवलासाठी लागू असतील
- जम्मू-काश्मीरच्या केंद्र शासित प्रदेशासाठी ३०,७५७ कोटी रुपये दिले जातील


इलेक्ट्रसीटीसाठी स्मार्ट मीटर


वीज घेण्यासाठी प्रीपेड सेवा, नवे वीज मीटर १ एप्रिलपासून
स्मार्टमीटरने सध्याची प्रणाली बदलणार त्यामुळे ग्राहकांना सप्लायर आणि रेट निवडण्याची मुभा मिळणार आहे.
अक्षय ऊर्जासाठी नॅशनल गॅस ग्रीड सुरु करणार आहे.
गॅस ग्रीड लाईन २७००० किमीपर्यंत विस्तारणार
नवी अर्थव्यवस्था आर्टिफिशयल इंटलिजन्स
खासगी क्षेत्राच्या मदतीने डेटा सेंटर पार्क उभारणार, त्यासाठी विधेयक आणू, 
तेलाच्या शोधासाठी प्रयत्न करणार आहोत. 


 आणखी हे अर्थसंकल्पात 


६लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांकडे मोबाईलफोन
स्मार्टफोनमुळे अंगणावाडी सेविकांचं काम सुधारलं
पोषण अभियानासाठी ३५००० कोटींची तरतूद
महिलांच्या योजनांसाठी २८६०० कोटींची तरतूद 
उडान स्किम अंतर्गत १०० नवी विमानतळ  बांधणार
एससी आणि इतर मागासवर्गीयांसाठी ८५००० कोटींची तरतूद २०२०-२१
५३७०० कोटी एसटींसाठी
दिव्यांगांसाठी ९५००० कोटींची तरतूद


कल्चर आणि टुरिझम


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम बनवणार
५ पुरातत्व केंद्र विकसित करणार (शिबसागर, हस्तिनापूर,धौलगिरी, राखीगढी)
सिंधु सरस्वती मॅरिटाईम साईट अहमदाबादजवळ उभारणारा त्यासाठी ३
राज्य सरकारांनी अशा विशेष पर्यटनस्थळांसाठी आराखडा तयार करावा
४ संग्रहालयांचा जीर्णोद्धार करणार
सांस्कृतिक मंत्रालयाला ३१०० कोटी
झारखंडमध्ये आदिवासी संग्रहालय