COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Today Petrol Diesel Rate : सर्वसामान्य जनतेला आज महागड्या पेट्रोल-डिझेल्या (petrol diesel rate) दरातून दिलासा मिळाला आहे की पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आज (19 जानेवारी पेट्रोल- डिझेलच्या दरात बदल झाला आहे की तेलाच्या किमती दरावर स्थिर आहेत? दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्या इंधनाचे दर जाहीर करते. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सतत तेजी-मंदीचे सत्र सुरु असताना सरकारी तेल कंपन्यांनी आज देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. 


आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर 


महाराष्ट्रात पेट्रोलच्या (petrol price) दरात घसरण झाली असून पेट्रोलचे दर 57 पैशांनी घसरून 105.96 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेल 54 पैशांनी घसरून 92.49 रुपये प्रतिलिटर झाले आहे. याशिवाय मध्य प्रदेशात पेट्रोलचा दर 30 पैशांनी कमी झाला असून तो 109.70 रुपये प्रतिलिटर झाला आहे. त्याचप्रमाणे डिझेल 28 पैशांच्या घसरणीसह 94.89 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. 


या भागात पेट्रोल स्वस्त नाही


राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यूपीमध्ये डिझेल 25 पैशांनी कमी झाले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 44 पैशांनी तर डिझेल 41 पैशांनी घसरले आहे. दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल किरकोळ महाग झाले आहे. तर चेन्नईतही पेट्रोल-डिझेल वाढले आहे. याआधी कच्च्या तेलात प्रचंड चढ-उतार होऊनही, तेलाच्या किमतीत फार दिवसांपासून फारशी वाढ झालेली नाही.


वाचा: मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बस अपघातात 4 ठार तर 23 जखमी 


शहर आणि तेलाचे दर


- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.64 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
- लखनौमध्ये पेट्रोल 96.44 रुपये आणि डिझेल 89.64 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 108.12 रुपये आणि डिझेल 94.86 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर


दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


घरबसल्या चेक करा नवे  दर 


तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.