Bus Accident : मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बस अपघातात 4 ठार तर 23 जखमी

Mumbai Goa Highway Bus Accident  : मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway ) दुसरा अपघात झाला आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला असून बसमधील 4 प्रवासी ठार तर 23 जण जखमी झालेत.

Updated: Jan 19, 2023, 08:29 AM IST
Bus  Accident : मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बस अपघातात 4 ठार तर 23 जखमी  title=
Mumbai Goa Highway Bus Accident

Mumbai Goa Highway Bus Accident  : मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway ) दुसरा अपघात झाला आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. (Bus Accident ) वागदे पुलानजीक खासगी बस चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात बसमधील 4 ठार तर 23 जण जखमी झालेत.  (Mumbai Goa Highway Accident

Mangaon Accident : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

रायगडमधील माणगावपासून रेपोली गावाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येत असताना कारवर जोरदार धडकला. यात 9 जण ठार झालेत. कारमधील लोकांचा यात समावेश असून मृतांमध्ये चार महिला पाच पुरूषांचा समावेश आहे. आता कणकवली येथे खासगी बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातत 4 ठार तर 23 जण जखमी आहेत.

Bus  Accident : मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बस अपघातात 4 ठार तर 23 जखमी

ही खासगी बस मुंबईहून गोव्याकडे जात होती. पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून, गडनदी पुलावरील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला. या बसमध्ये 36 प्रवासी होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.