Buisness Idea: ज्याला आयुष्यात कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नसते आणि छोटा का होईना व्यवसाय करायचा असतो, त्याच्यासमोर तसे पर्याय उभे राहत जातात. एका तरुणाने असाच एक व्यवसाय सुरु केला. आणि आता तो त्यातून मोठी कमाईदेखील करु लागलाय. या तरुणाच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया. फोटो पाहून एखाद्याला हे हॅलीकॉप्टर आहे, असे वाटू शकते. पण ही मुळची वॅगनर कार आहे. जिला खास डिझाइन करण्यात आले आहे. गंगाराम सिंह यांना सर्वांपेक्षा वेगळा व्यवसाय करायचा होता. असा व्यवसाय हवा होता, ज्यामध्ये जास्त कोणाशी स्पर्धा नसेल. मग त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली. ही आयडिया त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. आता ही हेलिकॉप्टरसारखी कार परिसरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे. 


व्हिडीओतून मिळाली प्रेरणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगाराम जसवंत सिंह यांची ही वॅगनर कार आहे. गंगाराम हे दबखेडी येथे राहतात. त्यांनी युट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला होता.कोलकाताच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानंतर गंगाराम यांनी त्या युट्यूबरसोबत संपर्क केला.  या कारचे रुपांतर त्यांनी हेलीकॉप्टरमध्ये करुन घेतले.


बॅंकेची नोकरी सोडून छोट्या दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..


यानंतर गंगाराम आपल्या वॅगनारने कोलकाता येथे गेले. कोलकात्याच्या दुर्गापूरमध्ये अब्दुल नावाच्या डेंटरने आणि त्याच्या टीमने कारला हेलिकॉप्टरचा आकार दिला. यासाठी गंगाराम यांना 3 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च आला.


विवाहसोहळ्यात वधूची एन्ट्री गंगाराम यांच्या या आगळ्या वेगळ्या वॅगनर म्हणजेच हेलिकॉप्टरमधून होते. विशेष म्हणजे त्याच्या आतील आसनव्यवस्थाही हेलिकॉप्टरसारखी आहे. गेल्या आठवड्यातच ते ही कार घेऊन कोलकाताहून निघाले आणि आपल्या घरी पोहोचले.


सशामुळे संपूर्ण घराला मिळाला रोजगार 


पण या कारची चर्चा ते घरी पोहोचण्याच्याआधी जगभर पोहोचली. आणि आतापर्यंत या कारला दोन बुकिंगदेखील मिळाल्या आहेत. पहिला नूरपूरमधील कुंदा खुर्द ते नगीनामधील नैनपुरा येथे एका विवाहाचे आमंत्रण मिळाले. दुसरे आमंत्रण धामपूर ते काशीपूरसाठी होते. 


गाडी पाहण्यासाठी गर्दी


आम्ही कुठेही गेलो तरी हॅलीकॉप्टरवाली कार पाहण्यासाठी गर्दी जमते, असे गंगाराम सांगतात. या गाडीतून चांगले उत्पन्न मिळण्याची जसवंत यांना आशा आहे. वधूला लग्नात आणण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. हुबेहूब हेलिकॉप्टरसारखी दिसणारी ही कार पाहण्यासाठी गाडी जिथे जाते तिथे गर्दी जमते.


शेतकऱ्याचा मुलानं भंगारापासून बनवलं हेलीकॉप्टर! खर्च 'इतका' कमी की विश्वास नाही बसणार