मुंबई : कॅपिटल मार्केटमध्ये पैसा लावताना साधारणतः गुंतवणूकदारांच्या मनात जास्त रिटर्न कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवल्याने येऊ शकतो याचा विचार केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विचार करा जर एका महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होणार असतील. तर तुमच्यासाठी हा नफ्याचा सौदा असेल. बाजारात सध्या असे काही शेअर आहेत, की जे 1 महिन्यात 100 ते 166 टक्के रिटर्न देत आहेत. अशाच 5 चांगल्या स्टॉक्सबाबतीत माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


Shree Renuka Sugars Limited: 166% रिटर्न
या शुगर स्टॉक कंपनीने 1 महिन्यात 166 टक्के रिटर्न दिला आहे. या दरम्यान, शेअरची किंमत 18 रुपयांवरून 48 रुपये झाली आहे. 


 


lobus Spirits : 107 % रिटर्न
ग्लोबस स्पिरिटने गुंतवणूकदारांना एका महिन्यात 107 टक्के रिटर्न दिले आहे. दरम्यान, या स्टॉकची किंमत 360 रुपयांनी वाढून 742 रुपये इतकी झाली आहे. उत्तर भारतातील ही मोठी कंपनी आहे.


Brightcom Group:  172% रिटर्न
Brightcom Group ने गेल्या 1 महिन्यात 172 टक्के रिटर्न दिला आहे. या स्टॉकचा भाव 10 रुपयांनी वाढून 28 रुपये इतका झाला आहे. ही एक डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे.


HFCL : 100 % रिटर्न
HFCL च्या स्टॉकने 1 महिन्यात साधारण 100 टक्के रिटर्न दिले आहेत. या दरम्यान शेअर 46 रुपयांनी वाढून 92 रुपये इतका झाला आहे. ही टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये बिझिनेस करणारी कंपनी आहे.


Ramky Infra : 114 % रिटर्न
या कंपनीने 1 महिन्यात 114 टक्के रिटर्न दिला आहे. ही एक इन्फ्रा सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. कंपनी कंन्स्ट्रक्शनसह  इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंटमध्येदेखील काम करते.