ट्रकच्या मागे `ओके टाटा` का लिहिलं असतं, काय आहे याचा अर्थ? रतन टाटांशी आहे संबंध
Ratan Tata : भारतात अनेक ट्रकच्या मागे OK TATA असं लिहिलेलं असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या शब्दाचा अर्थ काय आहे. अनेकांना या शब्दाचा नेमका अर्थ माहित नाही. जाणून घेऊया या शब्दाचा अर्थ आणि उद्योगपती रतन टाटा यांच्याशी त्याचा काय संबंध आहे.
Ratan Tata : भारतात अनेक ट्रकच्या मागे OK TATA असं लिहिलेलं असतं. रस्त्यावरुन येता जाता अनेकवेळा ट्रकच्या मागे लिहिलेला हा शब्द आपण वाचला असेल. काही ट्रकच्या नंबर प्लेटमध्ये मोठ्या अक्षरात ओके टाटा हा शब्द लिहिला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या शब्दाचा अर्थ काय आहे. अनेकांना या शब्दाचा नेमका अर्थ माहित नाही. या शब्दाचा उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्याशी त्याचा संबंध आहे. वास्तविक टाटा समुह दुचाकी आणि चार चाकी वाहनं बनवण्याबरोबरच ट्रक मॅन्युफॅक्चरिंगसाठीही (Truck Manufacturing) ओळखला जातो. पण दुचाकी आणि चार चाकी वाहनांवर ओके टाटा लिहिलं जात नाही. केवळ ट्रकवरच हा शब्द लिहिला जातो.
ट्रकच्या मागे 'ओके टाटा' का लिहिलं असतं?
टाटा समुहाकडून ज्या ट्रकची निर्मिती केली जाते त्या ट्रकवर ओके टाका असं लिहिलं जातं. या शब्दाचा अर्थ आहे या ट्रकची चाचणी करण्यात आली असून ट्रक चालवण्या योग्य आहे आहे. टाटा मोटर्सच्या मानकांनुसार वाहनाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. या वाहनांची वॉरंटी फक्त टाटाकडेच आहे. त्यामुळे ट्रकच्या मागे OK TATA असं लिहिलं जातं.
OK TATA बनला टाटा ग्रुपचा ब्रँड शब्द
ओके टाटा... हा शब्द टाटा समुहाच्या पॉलिसीचा एक भाग असला तरी हळू हळू हा शब्द ब्रँड बनला. संपूर्ण देशात हा शब्द प्रचलित झाला. आजही ओके टाटा म्हटलं की हा शब्द ट्रकच्या मागे लिहिलेला असते हे सर्वांना माहित झालं आहे.
ट्रक बनवणारी टाटा मोटर्स आज देशातील अव्वल ऑटोमोबाईल कंपनी आहे. या ऑटोमोबाईल कंपनीची सुरुवात 1954 मध्ये टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव (TELCO) कंपनीच्या रुपात झाली होती. त्यानंतर याचं नाव बदलण्यात आलं आणि टाटा मोटर्स करण्यात आलं. त्यावेळी टाटा कंपनी ट्रेनचं इंजिन बनवण्याचं काम करत होती. त्यावेळी दुसरं महायु्द्ध सुरु होतं आणि टाटा कंपनीने भारतीय सैन्याला टँकर पूरवले होते. या टँकरला टाटानगर टँक नावाने ओळखलं जात होतं. या टँकरने शत्रूंची दाणादाण उडवली होती.
काही काळानंतर टाटा समुहाने ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. टाटा समुहाने मर्सिजिज बेंझबरोबर भागिदारी करत 1954 मध्ये व्यावासायिक वाहन सुरु केली. 1991 मध्ये, कंपनीने प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि पहिले स्वदेशी वाहन टाटा सिएरा लाँच केलं. अशाप्रकारे एकामागून एक वाहने लाँच करून टाटाने इतिहास रचला आणि देशातील टॉप ऑटोमोबाईल कंपनी बनली.
टाटा समुहाने टाटा एस्टेट आणि टाटा सूमो गाजी भारतीय बाजारात उतरवली. टाटा सूमोने भारतीय बाजारात अक्षरश: धुमाकून घातली होती. त्यानंतर टाटा इंडिकानेही ग्राहकांच्या मनावर राज्य केलं. टाटाच्या या पहिल्या फॅमिली कारला 1998 मध्ये लाँच करण्यात आलं. या कारच्या विक्रीने एक नवा विक्रम रचला.
टाटा समुहाला एका नव्या उंचीवर नेणारे उद्योगपती रतन टाटा आज आपल्यात नाहीत. पण त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचा संघर्ष भारतीयांना नेहमीच प्रेरणा देत राहतील