Harpal Randhawa and Amer Randhawa Death : भारतीय उद्योग जगतात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या 60 वर्षीय अब्जाधीश हरपाल सिंग रंधावा आणि त्यांचा 22 वर्षीय मुलगा आमेर कबीर सिंग रंधावा यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला. मायनिंग कंपनी रियोजिमची मालकी असणाऱ्या रंधावा पिता पुत्राचा झिम्बाब्वे येथील एका Plane Crash मध्ये मृत्यू ओढावला. प्राथमिक माहितीनुसार या विमान अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. 



हेसुद्धा वाचा : 'शाहिद आणि त्याची मुलं...'; सावत्र मुलाविषयी काय म्हणाल्या सुप्रिया पाठक? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मशावा येथील Zvamahande येथे ही दुर्घटना घडली. हिऱ्यांच्या खाणीसाठी हा भाग ओळखला जातो. सोनं, कोळसा, निकोल आणि तांब्याचं उत्पादन घेणाऱ्या रियोजिम कंपनीची मालकी असणाऱ्या रंधावा आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूमागं विमानात झालेला तांत्रिक बिघाड हे प्राथमिक कारण सांगितलं जात आहे. 


आमेर कबीर सिंग रंधावा आणि हरपाल रंधावा यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं 4 ऑक्टोबर 2023 रोजी एका शोकसभेचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान सध्या विमान अपघाताची सविस्तर माहिती आणि ब्लॅकबॉक्समधून मिळणाऱ्या माहितीवर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.


हवेत आग लागली आणि... 


हेराल्ड वृत्तपत्रात पोलिसांच्या हवाल्यानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार ज्या विमानाचा अपघात झाला, त्यामध्ये चार परदेशी नागरिक प्रवास करत होते. यामध्ये दोन झिम्बाब्वेच्या नागरिकांचाही समावेश होता. पोलिसांच्या माहितीनुसार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांपासून 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रियोजिमचं एअरक्राफ्ट सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हरारे येथून खाणीच्या दिशेनं रवाना झालं. ज्यानंतर मशावा येथून साधारण 6 किमी अंतरावर विमानाचा अपघात झाला. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यानंतर Zvamahande येथील पीटर फार्ममध्ये ते कोसळलं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार विमानानं हवेतच पेट घेतला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर त्याचे छिन्नविछिन्न अवशेष पाहायला मिळाल्याची माहितीसुद्धा समोर आली. 


कोण आहेत हरपाल रंधावा? 


RioZim ची मालकी हरपाल रंधावा यांच्याचकडे होती. सध्याच्या घडीला ते GEM समुहाच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळत होते. यापूर्वी ते  Sabre Capital Worldwide शी तब्बल 12 वर्षे जोडले गेले होते.