'शाहिद आणि त्याची मुलं...'; सावत्र मुलाविषयी काय म्हणाल्या सुप्रिया पाठक?

Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता शाहिद कपूरची आई, सुप्रिया पाठक यांनी नुकतंच त्यांच्या कुटुंबातील नात्यांची समीकरणं सर्वांपुढे उलगडली. पाहा त्या काय म्हणाल्या...   

सायली पाटील | Updated: Oct 3, 2023, 11:16 AM IST
'शाहिद आणि त्याची मुलं...'; सावत्र मुलाविषयी काय म्हणाल्या सुप्रिया पाठक?  title=
Bollywood actress Supriya Pathak Shares Her Relationship With stepson shahid kapoor

Entertainment News : अभिनेता (Shahid Kapoor) शाहिद कपूर आणि त्याच्या कुटुंबात असणाऱ्या नात्याच्या समीकरणांची बरीच चर्चा कायम पाहायला मिळते. अभिनेत्याचे वडील आणि आई या दोघांनीही दुसरी लग्न करत आयुष्यात नव्यानं संसार थाटले. त्यामुळं अर्थातच नाही बदलली. काही नात्यांना पूर्णविराम मिळाला, तर काही नाती नव्यानं आकारास आली. इथं 'सावत्र'पण, फक्त बाहेरून पाहणाऱ्यांसाठीच होतं. कारण, प्रत्यक्षात मात्र नात्यांमधील ही समीकरणं अतिशय सोपी असल्याचंच स्पष्ट झालं. 

सुप्रिया पाठक आणि शाहिद कपूरची पहिली भेट... 

सुप्रिया पाठक यांनी 1988 मध्ये शाहिद कपूरचे वडिल पंकज कपूर यांच्याशी लग्न केलं. त्याआधी पंकज यांचा विवाह अभिनेत्री निलिमा अझीम यांच्यासोबत झाला होता. 1984 मध्ये निलिमा यांच्यासोबतच्या घटस्फोटानंतर त्यांनी सुप्रिया पाठक यांच्यासोबत लग्न केलं आणि कुटुंबात आणखी एक नवं नातं जन्मास आलं. 

नुकताच आगामी प्रोजेक्टच्या निमित्तानं सुप्रिया पाठक यांनी एका मुलाखतीत सावत्र मुलगा शाहिद आणि त्याची मुलं अर्थात आपल्या नातवंडांसोबतच्या नात्यावरून पडदा उचलला. 'शाहिद माझाच मुलहा आहे आणि त्याची मुलं ही माझी नातवंड आहेत. माझं नातवंडांशीही खुप सुरेख नातं असून, आम्ही हे नातं आणखी घट्ट होण्यासाठीच कायमच प्रयत्न करत असतो', असं त्या म्हणाल्या. आम्ही सर्वजण कुटुंबवस्तल असून, चांगल्या आणि पडत्या काळात एकमेकांची साथ देण्यालाच प्राधन्य देतो अशा शब्दांत त्यांनी कुटुंबातील नात्यांमध्ये डोकावण्याची संधी अनेकांना दिली. जसजशा पिढ्या आणखी पुढे जातील तसतसं हे नातं आणखी दृढ होईल असंही त्या म्हणाल्या. 

हेसुद्धा वाचा : बापरे! कागद हवेत उडावा, तसे अवकाशात तरंगतायत गुरुच्या आकाराचे महाकाय ग्रह, तज्ज्ञही पेचात 

 

काही दिवसांपूर्वी 'ट्विक इंडिया'साठी दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया पाठक यांनी शाहिदसोबतच्या पहिल्या भेटीवरून पडदा उचलला होता. जिथं पहिल्यांदाच भेटलो तेव्हा एकमेकांप्रती फारशी ओढ नव्हती असं सांगत आम्ही फक्त एकमेकांना व्यक्ती म्हणूनच भेटल्याचं स्पष्ट केलं. पुढं जेव्हाजेव्हा आपली भेट होत गेली त्यातूनच हे नातं आकारास आलं असं त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं. 

शाहिद कपूरच्या कुटुंबात नात्यांची गुंतागूंत 

पंकज कपूर यांनी अभिनेत्री निलिमा अझीम यांच्याशी लग्न केलं. या नात्यातून त्यांना शाहिद कपूरच्या रुपात अपत्यप्राप्ती झाली. ज्यानंतर पंकज यांनी सुप्रिया पाठक यांच्यासोबतच्या वैवाहिक नात्याचा प्रवास सुरु केला. सुप्रिया आणि पंकज यांना रुहान आणि सना कपूर अशी दोन मुलं. निलिमा अझीम यांनी पंकज कपूर यांच्याशी वेगळं झाल्यानंतर राजेश खट्टरशी लग्न केलं. अभिनेता ईशान खट्टर हा त्यांचाच मुलगा.