Owned House or Rented Property: आपलं स्वतःच हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं असतं. मात्र प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. अनेकांना घर घेणं शक्य असतं, पण सारासार विचार केलात तर स्वतःचं घर विकत घेण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक, पुढे भरावे लागणारे EMI याशिवाय एखाद्या भाड्याच्या घरात राहून रेंट देऊन उरलेले पैसे गुंतवणूक करणं अनेक जण पसंत करतात. नक्की कोणता ऑप्शन चांगला? जाणून घेऊयात दोन्ही पर्यायांचे ठोकताळे. 


घर खरेदीचं गणित समजून घेउयात :   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची जमवाजमव करावी लागेल. उदाहरणार्थ तुम्हाला 50 लाखांचं घर घ्यायचं झाल्यास त्यासाठी तुम्हाला किमान 10% डाऊन पेमेंट करावं लागतं. सोबतच तुम्ही लोनसाठी अर्ज केल्यास गृहकर्जाच्या एकूण प्रोसेससाठी किमान 40,000 हजार फी भरावी लागते. सोबत घरासाठीची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी आणि त्यावरील GST भरावा लागतो. यासाठी तुम्हाला किमान 4 लाख रुपये लागतील. म्हणजे तुमच्याकडे एकूण 9.50 लाख रुपये असायला हवेत. यानंतर तुम्हाला वरील 45 लाखांवर EMI देखील सुरू होऊ शकतो. 


आता भाड्याचं गणित समजून घेऊयात : 


50 लाखांचं घर साधारण वन बीएचके चं आसूस शकतं. तुम्ही असंच घर भाड्यावर घेतल्यास तुम्हाला किमान 15 हजार रुपये दर महिना घरभाडं भरावं लागेल. तुम्हाला सहा महिन्याचे पैसे डिपॉझिट म्हणून म्हणजे 90 हजार रुपये डिपॉझिट द्यावं लागेल. म्हणजे वर्षभरात तुमचा खर्च साधारण 3 लाख ( एजंटचे पैसे आणि रेंट ऍग्रिमेंट ) पकडून येऊ शकतो. 


भाड्यावर राहण्याने तुम्हाला कसा होतो फायदा 


जर तुम्ही गृहकर्ज न घेता तेच पैसे चांगला परतावा देणाऱ्या स्कीममध्ये किंवा शेअर बाजारात गुंतवलेत तर याचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. 


  • सुरुवातीची गुंतवणूक 6 लाख रुपये 

  • दर महिन्याला होणारी गुंतवणूक 15000

  • दर वर्षाला मिळणारं व्याज 15%

  • एकूण गुंतवणुकीचा कालावधी - 20 वर्ष 

  • वीस वर्षानंतर तुमच्या हातात पडणारी रक्कम 2 कोटी 80 लाख रुपये


चक्रवाढ व्यचच्या हिशोबाने तुमच्याकडे तब्बल 2 कोटी 80 लाख रुपये जमा होतील. म्हणजेच भाड्याचा घरात राहून गुंतवणूक करणं एक दृष्टीने फायद्याचं ठरू शकतं. 


नोंद - वरील माहिती सर्वसाधारण ज्ञानावर आधारित आहे. कुणालाही गुंतवणूक करायची झाल्यास किंवा वरीलपैकी कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.