मुंबई : आपल्या सर्वांना बँकेशी किंवा सरकारी कामासंबंधीत जी कागदपत्र लागतात, त्यात पॅन कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र आहे.  परमनंट अकाउंट नंबर (PAN) असा याचा फुलफॉर्म आहे. बँक खाते उघडण्यासाठी किंवा कोठेही गुंतवणूक करण्यासाठी सरकारी कार्यालयात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी हा फार आवश्यक आहे. सहसा लोक 18 वर्षानंतर पॅन कार्ड बनवतात, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की वयाच्या 18 वर्षापूर्वी देखील पॅन कार्डसाठी अर्ज केला जाऊ शकतो. आता हे कसं करावं? आणि याचे काय नियम आहेत? हे जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल, तर त्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. परंतु 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती थेट पॅन कार्डसाठी अर्ज करू शकत नाही. यासाठी त्याचे पालक त्याच्या वतीने अर्ज करू शकतात.


अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया


- जर तुम्हाला पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला NSDL च्या वेबसाइटवर जावे लागेल.
-  तेथे अर्जदाराची योग्य श्रेणी निवडून सर्व वैयक्तिक माहिती भरा.
- आता तुम्ही अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा आणि पालकांच्या फोटोसह इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे तेथे अपलोड करा.
- येथे फक्त पालकांची स्वाक्षरी अपलोड करा.
- 107 रुपये फी भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करा.
- यानंतर तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल, तुम्ही त्याचा वापर करून अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
- त्याच वेळी, अर्ज केल्यानंतर, तुम्हाला एक मेल येईल.
- यशस्वी पडताळणीनंतर 15 दिवसांच्या आत पॅन कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचेल.


18 वर्षाखालील मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असेल


- अल्पवयीन मुलाच्या पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक असेल.
- अर्जदाराचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक आहे.
- यासोबतच, अल्पवयीन मुलाच्या पालकाला ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
- पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पोस्ट ऑफिस पासबुक, मालमत्ता नोंदणी दस्तऐवज किंवा मूळ रहिवासी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागेल.


18 वर्षाखालील मुलांना पॅन कार्ड केव्हा आवश्यक आहे?


जर तो अल्पवयीन व्यक्ती स्वतः कमावत असेल किंवा त्या मुलाल गुंतवणुकीसाठी नॉमिनी ठेवायचा असेल किंवा मुलाच्या नावावर गुंतवणूक केली असेल. या सगळ्या गोष्टींसाठी 18 वर्षाखालील मुलांना पॅन कार्ड गरजेचं आहे.