Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा आपण सापाचे व्हिडीओ पाहिले असतील. त्यात साप आणि मुंगूस यांच्या झुंजीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मुंगूस हा सापाचा शत्रू असला मांजरीनाही साप आवडत नाहीत. साप मांजरींना बघितलं की पळून जाण्याचा प्रयत्न करतात. कारण मांजरी सापांना मारण्यात पटाईत असतात. साप लहान आणि बिनविषारी असतील तर ते मांजरीपासून दूर पळणे पसंत करतात. असात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मांजर आणि साप यांच्यात जुंपल्याचं दिसत आहे. साप रस्त्यावरुन सरपटत असल्याचं दिसत आहे. तेव्हा एक काळी मांजर आली आणि तिने सापावर हल्ला केला. मांजर खेळण्यासारखी सापाशी खेळत होती. तिने सापाला तोंडाने पकडून फिरताना दिसत आहे. मग तो साप जवळच्या व्यक्तीकडे घेऊन येताना दिसते. 



सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 'meowcat_happypet' या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 32,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स अवाक झाले आणि त्यांनी मांजरीला बेधडक संबोधले. व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त करताना एका यूजरने लिहिले की, 'मांजर निडर आणि धाडसी असतात.'