Central employees DA: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणरी बातमी आहे.  जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता कसा अपडेट केला जाईल हे सांगणे तज्ञांसाठी कठीण असू शकते. वास्तविक, महागाई भत्त्याची गणना करणार्‍या लेबर ब्युरोचा डेटा अपडेट केलेला नाही. एप्रिल 2024 पासून यात कोणताही बदल झालेला नाही. झी बिझनेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महागाई भत्ता वाढ जानेवारीमध्ये होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

AICPI निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीत, निर्देशांक क्रमांक 138.4 अंकांवर पोहोचला आहे. यामध्ये 0.9 अंकांची झेप दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्याची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना हा डेटा अद्याप लेबर ब्युरो शीटमधून गहाळ आहे. अशा स्थितीत यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हे तज्ज्ञांनाही कोडेच असल्याचे 'झी बिझनेस'वर सांगण्यात आले आहे. 


लेबर ब्युरोच्या अधिकृत वेबसाइट https://www.labourbureau.gov.in/allindiageneralindex-1 वरील डेटा एप्रिल 2023 नंतर अपडेट केलेला नाही. यासोबतच निर्देशांकातील बदलांबाबत कोणतीही नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली नाही. ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात निर्देशांक केवळ 134.2 वर दिसत आहे. त्यानंतरच्या महिन्यांचा डेटा गहाळ आहे.


महागाई भत्ता किती वाढू शकतो?
महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी 5 टक्के वाढ होऊ शकते. एआयसीपीआय निर्देशांकाने निर्धारित केलेला डीए स्कोअर असेच काहीतरी सूचित करतो. सध्याच्या ट्रेंडनुसार, महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. असे झाल्यास 5 टक्क्यांची मोठी झेप होईल. AICPI निर्देशांकावरून महागाई भत्ता मोजला जातो. निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शविते.


4 महिन्यांच्या डेटामध्ये डीए 3 टक्क्यांनी वाढ
सद्यस्थितीवर नजर टाकली तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरसाठी AICPI निर्देशांक जारी करण्यात आले आहेत. सध्या निर्देशांक 138.4 अंकांवर आहे, तर महागाई भत्ता स्कोअर 49.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 50 टक्क्यांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. यानंतर डिसेंबरमध्येही तो 0.54 अंकांच्या उसळीसह 51 टक्क्यांच्या जवळ दिसू शकतो. डिसेंबर २०२३ चे AICPI निर्देशांक आल्यानंतरच, एकूण महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे अंतिम होईल.


महागाई भत्त्यात मोठी वाढ 
7 व्या वेतन आयोगांतर्गत, AICPI क्रमांक जुलै ते डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ठरवतील. महागाई भत्ता सुमारे49.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. 2 महिन्यांचे आकडे येणे बाकी आहेत. त्यात आता 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर आपण कल पाहिला तर, सुमारे 1.60 टक्के वाढ अद्याप येऊ शकते. असे झाल्यास महागाई भत्ता 50.60 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. अशा स्थितीत, दशांश बिंदूच्या वरचा आकडा 51 टक्के मानला जाईल. महागाई भत्ता कॅल्क्युलेटर (डीए कॅल्क्युलेटर) उर्वरित महिन्यांत महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असे संकेत आहेत.