केळी उत्पादकांसाठी खुशखबर! केंद्र सरकारचा मोठा निर्णय
केळी उत्पादक आर्थिक संकटात सापडले होते.
नवी दिल्ली: अवकाळी पावसामुळे केळीबागेचे नुकसान झालेल्या बागायतदारांना रविवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर केली आहे.
चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादकांचे पावणेदोनशे कोटींचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे केळी उत्पादक आर्थिक संकटात सापडले होते. कृषी विभागाने पंचनामा केल्यानंतरही विमा कंपन्या मात्र नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करत होत्या.
मात्र, आता केंद्रीय कृषीमंत्र्यानी १०० कोटींची विमा भरपाई मंजूर केल्याने केळी उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.