मुंबई : राज्यासह देशभरात ऑक्सिजनअभावी कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतंय. दरम्यान रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमेडीसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरुन महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये तूतूमैमै सुरु होतं. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने मदतीचा पुढे केलाय. केंद्राकडून राज्यांना 6177 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राकडून महाराष्ट्राला 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्यात येणार आहे. असे असले तरी 20 एप्रिलनंतर हा ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. दरम्यान कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य सरकारांना वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवावी लागेल. पुरवठ्याबरोबरच मागणीही नियंत्रणात ठेवण्याची गरज असल्याचे गोयल म्हणाले. 


त्याचप्रकारे जर संसर्गाच्या केसेस सतत वाढत राहिल्या तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहीलं असेही ते म्हणाले. आम्ही राज्य सरकारसोबत पण त्यांना मागणीचे व्यवस्थापन करण्याची आणि त्यावर मात करण्याची गरज असल्याचे गोयल म्हणाले.



ऑक्सिजन पुरवठ्याची परवानगी 


महाराष्ट्राला रेल्वेच्या माध्यमातून वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्याची परवानगी रेल्वेनं दिलीय.. सोमवारी कळंबोलीमध्ये ही ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल होणार असून, त्याठिकाणी ऑक्सिजनचे ट्रक उतरवण्यात येणार आहेत. रेल्वेनं ट्रक उतरवण्यासाठी रॅम्पची माहिती मागवली असून रो-रो सर्व्हिसच्या माध्यमातून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. मालगाडीत ठेवलेले ट्रक, टँकर रॅम्प असलेल्या ठिकाणी उतरवले जाणार आहेत. वसईत तांत्रिक कारणामुळे रविवारी ऑक्सिजन एक्स्प्रेस येऊ शकली नाही.