निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : अर्थिक वर्षाच्या (Financial Year) शेवटच्या तिमाहीत सरकारच्या तिजोरीत मोठं डबोलं येण्याची शक्यता आहे. शेवटच्या तिमाहीत दरवर्षीप्रमाणे अर्थमंत्रालय निर्गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच अंतर्गत यंदा केंद्र सरकार व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या टेलिकॉम कंपनीत त्याच्या मालकीचा हिस्सा विकणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 10 जानेवारीला व्हायब्रंट गुजरात समिटच्या निमित्ताने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या (Elon Musk) एलॉन मस्क यांच्या टेस्ला (Tesla) या कार बनवणाऱ्या कंपनीचा पहिला प्रकल्प गुजरातमध्ये येणार असल्याची सूत्राची माहिती आहे. मस्क यांच्याच मालकीच्या स्टार लिंक या सॅटेलाईट कम्युनिकेशन कंपनीलाही भारतात प्रवेश हवा आहे. व्होडाफोन-आयडीया या देशातील तिसऱ्या क्रमांकांची मोठी टेलिकॉम कंपनी आहे. पण गेल्या चार-पाच वर्षातव्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) आर्थिक संकटात आहे. 


साधारण ऑगस्ट 2023 मध्ये व्होडाफोन-आयडियावर सरकारला असाणाऱ्या देण्यापोटी कंपनीचा हिस्सा सरकारच्या नावे झाला आहे. आता हाच हिस्सा विकत घेण्यासाठी इलोन मस्क यांची स्टारलिंक ही कंपनी उत्सुक असल्याची जोरदार चर्चा शेअर बाजारात आहे. 


दरम्यान, सरकारी पातळीवर किंवा व्होडाफोन-आयडिया कंपनीने या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात व्होडाफोन आयडियाचा शेअर मात्र 80 टक्के वधारालाय. सरकारच्या तिजोरीत किती रक्कम येणार?आयडिया-व्होडाफोन कंपनीकडे सरकारचे सुमारे 30 हजार कोटींचं देणं होतं. त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे सुमारे 16 हजार कोटी रुपये किंमतीचे समभाग व्होडाफोन आयडियाने ऑगस्ट 2023 मध्ये सरकारच्या नावे केले. हा हिस्सा साधारण 33.44 टक्के होता. 


हेसुद्धा वाचा : 


गेल्या सहा महिन्यात दोन ते तीन वेळा सरकारने व्होडाफोनमधील हा जबरदस्तीने मिळालेला हा हिस्सा विकण्याचा प्रयत्न केलाय. पण सौदा फारसा नफ्याचा होत नाही हे लक्षात आल्यावर सरकारने एक पाऊल मागे घेतलं. सध्या आयडिया-व्होडाफोनच्या समभागाची किंमत गेल्या तीन-चार आठवड्यांपासून 15 रुपयांच्या वर आहे. त्यामुळे सरकारला मिळालेल्या हिस्सा बाजारभावाने कुणी घेतल्यास साधारण 50 टक्के नफ्याचा सौदा होऊन सरकारी तिजोरीत किमान 20- 22 हजार कोटींची रक्कम येऊ शकते.


What an Idea सर जी...


भारतातील टेलिकॉम कायद्यानुसार कोणत्याही परदेशी कंपनीला भारतात टेलिकॉम क्षेत्रात उतरायचं असेल, तर भारतीय पार्टनर असणे बंधनकारक आहे. भारताची टेलिकॉम बाजरपेठ, डेटाचा मागणी यासगळ्याचा विचार करुन स्टारलिंकला भारतात दुकान थाटण्याची घाई आहे. सरकारलाही अडकलेली देणी सोडवायची आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचे वर्णन दोघांसाठीही इंग्रजीत Win-Win situation असं करता येईल म्हणूनच सध्या शेअर बाजारात व्होडाफोन- आयडियाच्या टॅगलाईनची म्हणजे 'What an Idea सरजी' ची चांगलीच चर्चा आहे.