बंगळुरु : मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी रविवारी कर्नाटकमधील नेतृत्व बदलाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जोपर्यंत पक्षाच्या हायकमांडचा त्यांच्यावर विश्वास आहे तोपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री राहतील. येडियुरप्पा म्हणाले की, याबद्दल त्यांच्या मनात कोणताही भ्रम नाही.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकचं मुख्यमंत्री बदलण्याबाबतच्या प्रश्नावर येडियुरप्पा यांनी उत्तर दिले की, जोपर्यंत दिल्ली हायकमांडचा त्यांच्यावर विश्वास आहे तोपर्यंत ते मुख्यमंत्री म्हणून राहतील. ज्या दिवशी पक्ष मला सांगेल की, मी पक्षाला या पदावर नकोय, त्या दिवशी मी राजीनामा देईन. राज्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करत राहिल.'


मी कुठल्याही भ्रमात नाही: येडियुरप्पा


कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी कोणत्याही भ्रमात नाही. पक्षाने मला संधी दिली आहे. चांगल्या संधीचा उपयोग करण्यासाठी मी माझ्या शक्तीपलीकडे जावून प्रयत्न करीत आहे. बाकी सर्व काही हायकमांडवर आहे.'


पर्यायी नेतृत्वाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'मी कोणावरही टीका करणार नाही. पर्याय नाही याबाबत मी सहमत नाही. राज्यात आणि देशात नेहमीच पर्यायी व्यक्ती असतील. त्यामुळे कर्नाटकात पर्यायी व्यक्ती नाही हे मला मान्य नाही, परंतु जोपर्यंत हायकमांडला विश्वास आहे तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदावर कायम राहिल.'