मुंबई : 'लहानपण देगा देवा' हे आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं. आपण मोठं झालो की, आपल्याला लहानपणीचे किंवा शाळेतील ते दिवस आठवतात, जे खूपच मजेशीर असतात. लहानपणी ना उद्याची काळजी सतावते, ना करिअर आणि पैशांचं ओझ असतं. ज्यामुळे लहानपणीचं आयुष्य हे खूप चांगलं असं आपल्याला वाटतं. फक्त खेळणं आणि बागडणं हे प्रत्येक लहान मुलाचं काम, पण या सगळ्यात नको नकोसा वाटतो, तो म्हणजे अभ्यास. म्हणून तर कोणत्याही लहान मुलाला लवकर मोठं व्हायचं असतं. कारण त्याला फक्त असंच वाटत असतं की, मोठ झालं की आपल्याला अभ्यास करायला लागणार नाही. अल्लड मुलं ते... त्याला कुठे माहित असणार मोठं होणं म्हणजे नक्की काय ते....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला देखील लहानपणी शाळेत जाण्यासाठी कंटाळा यायाचं. परंतु आता दे दिवस आठवले की, पुन्हा शाळेची ओढ लागते. परंतु आता ते आपल्याला शक्य नाही. कारण, ते म्हणतात ना, 'गेले ते दिवस... राहिल्या त्या फक्त आठवणी.'


सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सर्वांना त्याच्या लहानपणाची आठवण करुन देत आहे.


या व्हिडीओमध्ये एक लहान मुल आहे. ज्याला शाळेत ज्यायचं नाहीय, पण तरीही त्याची आई, त्याला जबरदस्ती हात पकडून घेऊन जातेय. लहानपणी प्रत्येकासोबत असं एकदा तरी घडलंच असावं आणि याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


यावर लोक कमेंट करुन आपल्या लहानपणाच्या गोष्टी आणि किस्से शेअर करत आहेत.


व्हायर होणाऱ्या या व्हिडीओत एक लहान मुलगा आहे. ज्याला शाळेत जायचं नाहीय, म्हणून तो आपली शाळेची बॅग फेकून देतो. ज्यानंतर त्याची आई ही बॅग उचलते आणि त्या मुलाला मारते आणि त्याला ओढत- ओढत शाळेच्या दिशेने घेऊन जाते.


परंतु कितीही झालं, तरी या मुलाचा शाळेच जाण्याचा मुड काही दिसत नाहीय, ज्यामुळे तो आपल्या आई भोवती फिरत राहातो.



परंतु आईच ती, तिने ही निश्चय केलाय की याला शाळेत सोडणारंच, मग काय दिले दोन धपाटे ठेऊन. परंतु असं असलं तरी, तो मुलगा काही गप्पं बसत नाही. त्याची नाटकं ही सुरूच असतात. हा व्हिडीओ इथेच संपतो.


हा व्हिडीओ फारच मनोरंजक आहे. जो सर्वांना त्यांच्या लहानपणीची आठवण करुन देत आहे.