China On India To rename Bharat: देशात सध्या देशाचं नाव इंडिया असावं की भारत यावरुन वाद सुरु आहे. हा वाद सुरु असतानाच नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या जी-20 परिषदेमध्ये आयोजनामध्येही याची झलक पाहायला मिळाली. राष्ट्रपती भवनामधून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांवर भारताचे राष्ट्रपती असा उल्लेख होता. सामान्यपणे हा उल्लेख इंडियाचे राष्ट्रपती असा असायचा. दरम्यान जी-20 मध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटनसहीत एकूण 25 हून अधिक देशांचे प्रतिनिधिक सहभागी होत आहेत. या सर्व देशांचे प्रमुख नेते भारतात येत असले तरी चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग भारतामध्ये येणार नाहीत. जी-20 च्या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याच्या कालावधीत देशाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादासंदर्भात भारताचा कट्टर प्रसिस्पर्धी असलेला आणि लडाखबरोबरच अरुणाचल प्रदेशच्या सीमांवजळ अनेकदा कुरापत्या करणाऱ्या चीनने भारताचा नावासंदर्भात फुकटचा सल्ला दिला आहे.


आर्थिक परिस्थितीमध्ये अधिक सुधारणा करु शकतो का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनने भारताला टोला लगावाताना, जी-20 च्या आयोजन करताना भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरातील देशांना प्रभावित करण्याची संधी म्हणून या कार्यक्रमाकडे भारत पाहत असल्याचं चीनने म्हटलं आहे. भारताला हा प्रभाव पाडायचा असेल तर त्यांनी देशाच्या नावाऐवजी इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष दिलं पाहिजे असा सल्ला चीनने दिला आहे. चीनमधील कम्युनिस्ट सरकारचे मुखपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'मधून हा सल्ला देण्यात आला आहे. भारत आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये अधिक सुधारणा करु शकतो की नाही? भारताला क्रांतिकारी सुधारणा केल्याशिवाय क्रांतिकारक विकास करता येणार नाही. अपेक्षा आहे की भारताला जी-20 च्या आयोजनामधून जी जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळत आहे त्याचा योग्य पद्धतीने वापर करेल. हा प्रभाव वापरुन देशाला विकासाच्या दिशेने नेत्यात त्यांना यश येवो असंही चीनने म्हटलं आहे.


नक्की वाचा >> तब्बल 14,000 कोटी! India चं 'भारत' करण्यासाठी होणाऱ्या खर्चाची आकडेवारी आली समोर


देशाचं नाव बदलण्याऐवजी...


'ग्लोबल टाइम्स'च्या माध्यमातून भूमिका मांडताना चीनने, 1991 च्या आर्थिक सुधारणांनंतर मोदी सरकार हे भारतामधील सर्वात महत्त्वकांशी सरकार आहे असंही म्हटलं आहे. मात्र दुर्देवाने भारताने आपलं सर्व लक्ष व्यापार आणि संरक्षणासंदर्भातील वादावर केंद्रित केलं आहे असा टोलाही चीनने लगावला आहे. देशाचं नाव बदलण्याऐवजी त्याला अधिक सक्षम करणं गजरेचं आहे. देशाचं नाव बदलण्यापेक्षा इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत, असा सल्ला चीनने दिला आहे.


नक्की वाचा >> BJP चा ठपका मारणाऱ्यांवर सेहवाग संतापला! 'इंडिया आघाडी', नेहरु सारंच काढलं; मोदींचाही उल्लेख


भारताने जेव्हा जेव्हा आर्थिक सुधारणा केली तेव्हा...


काही चिनी कंपन्यांवर भारताने आणणलेल्या निर्बंधांबद्दलच्या अहवालामध्ये जगभरातील देशांसाठी आपल्या बाजारपेठेची दारं न उघडणाऱ्या भारताला वाटत असलेली भीती समजण्यासारखी आहे. मात्र 1947 नंतरचा इतिहास सांगतोय की, जेव्हा जेव्हा भारताने सुधारणेला वाव दिला किंवा आर्थिक उदात्तीकरणाचं धोरण स्वीकारलं तेव्हा देशाचा विकास झाला आहे.


नक्की वाचा >> देशाचं नाव बदलण्याची चर्चा : पण आपल्या देशाला 'भारत' आणि 'इंडिया' नावं पडली कशी?


जी-20 चं अध्यक्षपद भारताला मिळाल्यासंदर्भात काय म्हटलं?


जी-20 च्या अध्यक्षतेसंदर्भात बोलताना चीनने भारताला जी-20 चं अध्यक्षपद करण्याची संधी मिळाली असून याचा वापर त्यांनी स्वत:ची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी करावा असं सुचवलं आहे. भारताने परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. परदेशी गुंतवणूकदारांना व्यवसाय करण्यासाठी निष्पक्षपातीपणे संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, असंही चीनने म्हटलं आहे.