मुंबई : Corona व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव अनेक राष्ट्रांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मुख्य म्हणजे चीनसोबतच भारतातही दहशत परसवलेल्या या व्हायरसच्या दृष्टीने आता भारतीयांसाठी धोक्याचा इशारा असल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होळी आणि रंगपंचमीनंतर भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू शकते, असा धोक्याचा इशारा चीनमधील काही तज्ज्ञांनी दिला आहे. भारतात अनेक ठिकाणी सध्या साधारण ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान आहे. त्यामुळे हे तापमान कोरोना विषाणूच्या प्रसारास पूरक असल्याचं म्हटलं जात आहे. परिणामी येत्या काळात कोरोनाचा धोका आणखी वाढणार असल्याचं चित्र आहे. 


होळीसाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, उत्साही लोक आणि एकंदर कल्ला पाहता या साऱ्या वातावरणात कोरोनाचा प्रसार आणखी झपाट्याने होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. याच धर्तीवर अनेक ठिकाणी होळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शिवाय काही कार्यक्रमांमध्ये या विषाणूचा प्रसार न होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावलंही उचलली जात आहेत.



पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 


चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोनानं आता जगभरात थैमान घातलं आहे. जगातील ९० हून अधिक देशात सुमारे १ लाख ९ हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी ३ हजार ८०२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चीनमागोमाग आता इटलीतही कोरोनाचा संसर्ग बळावत आहे.