कोल्डड्रिंक, सिगरेट आणि तंबाखूवरील GST 35 टक्के वाढणार? `या` वस्तूही महागण्याची शक्यता
Tobacco GST Rates: तंबाखू, सिगरेट आणि कोल्ड ड्रिंक यासारख्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तशी शिफारस करण्यात आली आहे.
Tobacco GST Rates: कोल्ड ड्रिंक, सिगरेट आणि तंबाखू यासारखे हानिकारक उत्पादन महाग होऊ शकतात. जीएसटी कररचना सुलभ करण्यासाठी गठित समितीने या उत्पादनांवरील कर सध्याच्या 28 टक्क्यांवरुन 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. त्यामुळं या उत्पदनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मंत्रिगटाच्या बैठकीने केलेल्या शिफारसीवर जीएसटी परिषद अंतिम निर्णय घेणार आहे. मंत्रीगटाने जीएसटी परिषदेला एकूण 148 वस्तूंवरील कररचनेत बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भूमिकेमुळं महसुलावर सकारात्मक परिणाम होईल. मंत्रीगटाने तंबाखू आणि त्यापासून बनणाऱ्या उत्पादकांसोबतच एयरेटेड शीतपेयांवरही 35 टक्के विशेष दर लावण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, 5,12,18 आणि 28 टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जीएमओकडून 35 टक्के नवीन दर प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचबरोबर जीओएमने 1500 रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर 5 टक्के जीएसटी तर 1500 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर 18 टक्के आणि 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रेडिमेड कपड्यांवर 28 टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस केली आहे. मंत्रिगटाने लेदर बॅग, सौंदर्यप्रसाधनांसह अनेक लक्झरी वस्तूंवर जीएसटी वाढवण्याची शिफारस केली आहे.
मंत्रिगटाच्या रिपोर्टवर 21 डिसेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. परिषदेच्या अध्यक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण करणार असून यात राज्यांचे अर्थमंत्रीदेखील सामिल होणार आहेत. जीएसटी दरात बदल करण्याच्या मुद्द्यावरुन जीएसटी परिषद अंतिम निर्णय घेण्यात येईल. सध्या जीएसटीची चार-स्तरीय कर संरचना असून यात 5,12,18 आणि 28 टक्कांपर्यंत स्लॅब आहेत.
जीएसटी परिषदेची 55वी बैठक 21 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानच्या जैसलमेर येथे होणार असून या बैठकीत जीएसट कमी जास्त करण्यावर निर्णय होईल. या बैठकीत आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील जीएसटी कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिफारस कोणत्या उत्पादनांवर केली आहे?
सायकलः 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या सायकलवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्के कमीची शिफारस केली आहे.
पाण्याची बाटलीः 20 लिटर पाण्याच्या बाटलीवरील जीएसटी 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस केली आहे.
एक्सरसाइज नोटबुकः मुलांसाठी एक्सरसाइज नोटबुकवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्याची शिफारस
घड्याळः मनगटावरील घड्याळ 25 हजारांपेक्षा अधिक किंमतींवर 18 टक्क्यांवरुन 28 पर्यंत जीएसटी वाढवण्याची शिफारस
शूजः 15,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शूजवर जीएसटी 18 टक्कांवरुन 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस