VIDEO : मेट्रो स्टेशनवर तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, जवानांनी असे वाचवले तिचे प्राण
मुलीने खाली उडी मारली आणि खाली उपस्थित असलेल्यांनी असे वाचवले तिचे प्राण
नवी दिल्ली : पंजाबमधील एका तरुणीने गुरुवारी दिल्लीतील अक्षरधाम मेट्रो स्थानकावर 40 फूट उंच प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु सीआयएसएफ जवानांनी आणि इतरांच्या सतर्कतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी 7.30 च्या सुमारास या मेट्रो स्थानकावर प्रवाशांनी या महिलेला प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या काठावर उभ्या असलेल्या पाहिल्यावर त्यांनी सीआयएसएफला माहिती दिली आणि सीआयएसएफचे जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी महिलेला असं पाऊल उचलू नका असे सांगितले. तरुणीचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तरुणी ऐकायला तयार नव्हती.
तरुणीचे प्राण वाचवण्यासाठी एक टीम खाली उतरली. मुलीने खाली उडी मारली आणि खाली उपस्थित असलेल्या सीआयएसएफ आणि इतरांनी ब्लँकेट पसरवून तिला वाचवले.
सेंट्रल इंडस्ट्रियल रिझर्व्ह फोर्स (CISF) च्या प्रवक्त्याने सांगितले की, "उंचीवरून खाली पडल्यानंतर तरुणी जखमी झाली. परंतु तिचे प्राण वाचले आहेत. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत." सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की 20-22 वर्षीय महिला ही पंजाबमधील आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.