नवी दिल्ली : भारतात विंटेज म्हणजेच जुन्या वाहनांबाबत कोणतेही नियम नाहीत. देशातील सर्व राज्यांमध्ये याबाबत एक धोरण ठरवण्यावर चर्चा सुरू आहेत. अशातच रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅडलवरून यासंबधी ट्वीट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात त्यांनी म्हटले आहे की, लवकरच या विषयावर राष्ट्रीय प्रणाली तयार करण्यात येईल. ज्या माध्यमांतून विंटेज वाहनांची नोंदणी शक्य होईल. विधी मंत्रालयाद्वारे विंटेज वाहनांच्यासंदर्भातील धोरणाला मंजूरी मिळाली आहे. परंतु  धोरणाची अंमलबजावणी होणे बाकी आहे. या धोरणाला लागू केल्यानंतर नोंदणीप्रक्रीया करता येणार आहे.


नोंदणीवर किती येईल खर्च
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या एका ड्राफ्ट नुसार जुन्या विंटेज वाहनांच्या नोंदणीसाठी प्रति कार 20 हजार रुपये खर्च येणार आहे. त्याची वैधता 10 वर्ष इतकी असेल. त्यानंतर पुनर्नोंदणीसाठी वाहनमालकाला 5000 रुपये भरावे लागणार आहे.


विंटेज वाहनांचा मर्यादित वापर
नोटिफिकेशनच्या मते, विंटेज मोटार वाहनाला फक्त प्रदर्शन, तांत्रिक शोध, कार रॅली, इंधन भरण्यासाठी इत्यादी कारणासाठी चालवण्याची परवानगी असेल. त्याचा उद्देश भारतातील जुन्या वाहनांचा ठेवा जतन करणे हा असणार आहे.