वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील आयुर्वेदिक डॉक्टर आणि संशोधक कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांची एकत्रित क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा विचार करत आहेत, असं अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंह संधू यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रख्यात भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ, विद्वान आणि डॉक्टरांच्या समूहाशी डिजिटल संवाद साधताना संधू म्हणाले की, संस्थात्मक भागीदारीच्या व्यापक समुदायामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत दोन्ही देशांतील वैज्ञानिक समुदाय एकत्र आले आहेत. त्यांनी सांगितलं की, एकत्रित संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांद्वारे देशातील संस्था आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी एकत्र आले आहेत.


दोन्ही देशातील आयुर्वेदिक चिकित्सक आणि संशोधक कोरोनाविरोधात बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांची संयुक्त क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा विचार करत आहेत. यासाठी आपले वैज्ञानिक ज्ञान आणि संशोधन संसाधनांची देवाणघेवाणही करत आहेत.


राजदूत यांच्या मते, भारतीय औषध कंपन्यांची अमेरिकास्थित संस्थांशी कमीत-कमी तीन भागीदारी आहेत. याचा फायदा केवळ भारत आणि अमेरिकेलाच होणार नाही, तर जगभरातील कोट्यवधी लोकांना याचा फायदा होणार आहे ज्यांना कोरोनापासून बचावासाठी लसीची आवश्यकता आहे.