उत्तराखंडमध्ये ढगफुटी, दुकाने आणि घरांचं मोठं नुकसान
उत्तराखंडमध्ये ढगफुटीने मोठं नुकसान
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील वातावरण सध्या बदललं आहे. दिवसेंदिवस येथे वातावरणात बदल होत आहे. डोंगराळ जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. टिहरी जिल्ह्यातील देवप्रयाग येथे ढगफुटीने मोठं नुकसान झालं आहे. अनेक दुकाने व घरे यामध्ये वाहून गेली आहे. कोविड कर्फ्यूमुळे दुकाने बंद होती. पण कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
उंच शिखरावर पावसाचा जोर कायम आहे. डोंगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. मैदानी प्रदेशातही हवामानाचा रंग बदलत आहे. मुसळधार पावसामुळे देवप्रयागमधील ढगफुटीमुळे बरेच नुकसान झाले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले. सध्या एसडीआरएफची टीम घटनास्थळाकडे पोहचली आहे.
यापूर्वी 6 मे रोजी ढगफुटीमुळे घनसाली आणि जाखणीधार ब्लॉक मध्ये बरेच नुकसान झाले होते. घनसाली मार्केटमध्ये अनेक हेक्टर जमीन वाहून गेली तर अनेक वाहने मातीखाली दाबली गेली.