Government News : गडगंज पगार, सातत्यानं लागू होणारे वेतन आयोग आणि सुट्ट्यांच्या बाबतीतसुद्धा दिलासा असल्यामुळं अनेकांचाच कल सरकारी नोकरीकडे दिसून येतो. सध्याची तरुणाईसुद्धा (Corporate jobs) कॉर्पोरेट क्षेत्रांकडून सरकारी नोकऱ्यांकडे वळताना दिसत आहेत. अर्थात यामागे कैक कारणं आहेत. पण, आता मात्र (Government jobs) सरकारी नोकरी मिळवण्याची ही प्रक्रिया आणखी अवघड झाल्याचं पाहायला मिळत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी (CM) केलेल्या घोषणेनंतर यासंदर्भातील बहुतांश गोष्टी अधिक स्पष्ट झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी नोकरी मिळवण्याच्या हेतूनं तयारी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी  आहे. पण इथं लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे ही प्रक्रिया तूर्तास महाराष्ट्रात (Maharashtra) अवघड झालेली नाही. तर, हे महत्त्वाचे बदल गोव्यामध्ये करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली. 


काय आहे ही नवी अट? 


उत्तर गोव्यातील (North Goa) तळेगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात सावंत बोलत होते. त्यावेळी भविष्यात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एक वर्षाच्या कामाचा अनुभव अनिवार्य असण्याची अट लागू करण्यात येईल असं स्पष्ट केलं. या अटीमुळं कुशल कर्मचाऱ्यांची निवड करणं अधिक सोपं होईल, असंही ते म्हणाले. 


वाचा : इतिहासात पहिल्यांदाच पिता-पुत्र CJI, उद्या देशाला मिळणार 50 वे सरन्यायाधीश


सदरील अट लागू करण्यासाठी भर्ती नियमांमध्ये (RR) काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांनी काही उदाहरणंही उपस्थितांपुढे ठेवली. 'अशाही घटना घडल्या आहेत, जिथं पदवी शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच काहींनी अकाऊंट्स किंवा तत्सम पदांसाठी अर्ज केले होते. हाच प्रकार PSI पदांच्या भर्ती प्रक्रियेतही पाहायला मिळाला होता. पण, आता मात्र असं होणार नाही', ही बाब सावंत यांनी अधोरेखित केली. 


भविष्यात बदलणार संपूर्ण Recruitment Process


भविष्यात सरकारी नोकरीसाठी भर्ती प्रक्रियेमध्ये मागील नोकरीचा अनुभवही ग्राह्य धरला जाईल. किंबहुना तो अनिवार्य असेल. त्यामुळे फक्त परीक्षा उत्तीर्ण होऊनच सरकारी नोकरी मिळवता येईल, हा गैरसमज आता दूर होईल असे संकेत त्यांनी आपल्या वक्तव्यातून दिले. 


सरकारी नोकरीआधी अर्जदारांना (Government jobs application) एखाद्या खासगी क्षेत्रातील नोकरीचा अनुभव असावा असा आग्रही सूर आळवत यासंदर्भातील कामकाजावर भर दिला जात असल्याची माहिती सावंत यांनी दिली. त्यामुळं गोव्यामध्ये एखाद्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असाल, तर त्यापूर्वी एखाद्या ठिकाणी कामाचा अनुभव घ्या.